Saturday, July 18, 2009

अण्णाभाऊ साठे

** लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन **


***** आजची वात्रटिका *****
**********************

अण्णाभाऊ साठे

साहित्याच्या समीक्षॆने
नको त्याचा बाऊ केला.
होईल तेवढा खुजा
माझा अण्णाभाऊ केला.

सार्‍या जगाला कळला
पण त्यांना कळला नाही.
कोंबडे गप्पगार बसले
सूर्योदय टळला नाही.

सारे षड्‍यंत्र उमगले
कशाला आणू बोलुनी आव ?
लोकशाहीरच गाऊन गेलाय
जग बदल घालुनी घाव !

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments: