Saturday, November 16, 2019

सुखाची गुरुकिल्ली

आजची वात्रटिका
------------------------------------------
सुखाची गुरुकिल्ली
सुख,समाधान,शांतता,एकी,
हा आपला निव्वळ भ्रम असतो.
कुणाचाही सुखी संसार म्हणजे,
किमान समान कार्यक्रम असतो.
कितीही जीवाची मुंबई केली तरी,
खूप दूरवरती दिल्ली असते !
किमान समान कार्यक्रम हीच,
सुखी संसाराची गुरुकिल्ली असते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7122
दैनिक झुंजार नेता
16नोव्हेंबर2019

अजेंड्याची कॉमनता

आजची वात्रटिका
------------------------------------------
अजेंड्याची कॉमनता
जिथे मसावी काढायला हवा,
तिथे लसावी काढला जातो.
अंकगणितात बीजगणित घालून,
समीकरणाचा तुकडा पाडला जातो.
खाली बुडखा नसला तरी,
वर मात्र सत्तेचा झेंडा असतो !
तोंड दाबून बुक्क्यांचा मार,
असा ' कॉमन अजेंडा ' असतो !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5627
दैनिक पुण्यनगरी
16नोव्हेंबर2019

Friday, November 15, 2019

किमान समान कार्यक्रम

आजची वात्रटिका
------------------------------------------
किमान समान कार्यक्रम
किमान समान कार्यक्रमात
सगळेच किमान असते.
जनता गेली उडत,
फक्त खुर्चीशी इमान असते.
काही करायचे म्हटले तर,
त्याला भलतीच लामन असते !
सरकार कुणाचेही असो,
सगळे काही कॉमन असते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7121
दैनिक झुंजार नेता
15नोव्हेंबर2019

चिरंजीव लोकशाही

आजची वात्रटिका
-----------------------------------------
चिरंजीव लोकशाही
पुन्हा तेच बांधेकरी आहेत,
पुन्हा तेच वांधेकरी आहेत.
लोकशाहीची काढती प्रेतयात्रा,
पुन्हा तेच खांदेकरी आहेत.
लोकशाहीचा मुडदा पाडण्याची,
त्यांना खूप सवय झालेली आहे !
खांदेकरी सोकलेले असले तरी,
लोकशाही अमृत प्यालेली आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5626
दैनिक पुण्यनगरी
15नोव्हेंबर2019

Thursday, November 14, 2019

बालकांच्या पालकांसाठी....आठवणीतील वात्रटिका
----------------------------------------
बालकांच्या
पालकांसाठी....
----------------------------------------
मुलं नसतात मातीचे गोळे,
तुम्हीही काही कुंभार नाही.
पारंपारिक दृष्टीकोनापुढे
तुम्हांला काही सुंबार नाही.
मुलातले व्यक्ति‘त्त्व उ‘लू द्या,
तुम्ही तुमचे डाव साधू नका.
आतले बाहेर येण्यापूर्वीच
वरतून काही लादू नका.
जसे झुलायचे तसे झुलू द्या,
जसे फुलायचे तसे फुलू द्या !
जिकडे दिसतो त्यांचा कल
खुशाल तिकडे कलू द्या !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-3831
दैनिक पुण्यनगरी
14नोव्हेंबर2014
----------------------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त निवडक
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना
शेअर करण्यासाठी क्लिक करा.

काय चेष्टा आहे?

आजची वात्रटिका
-----------------------------------------
काय चेष्टा आहे?
भाजपा अस्वस्थ आहे,
सेना अत्यावस्थ आहे.
काँग्रेसची ' हात ' घाई,
राष्ट्रवादी धरणग्रस्त आहे.
गडबड आहे,गोंधळ आहे,
अविश्वास हेच सार आहे.
ते पक्ष मात्र बिनधास्त,
ज्यांचा एक एक आमदार आहे.
धोक्यात महत्वाकांक्षा,
धोक्यात आज निष्ठा आहे !
बिनसा- बिनसी दिसली की,
ते म्हणतात, ही चेष्टा आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5625
दैनिक पुण्यनगरी
14नोव्हेंबर2019