Thursday, February 14, 2019

खरा प्रेमयोग


आ।ज।ची।
मा।लि।का। वा।त्र।टि।का
---------------------------------
खरा प्रेमयोग
गल्लीवर प्रेम करा,
दिल्लीवर प्रेम करा.
साध्यासुध्यावर करण्यापेक्षा
एखाद्या वल्लीवर प्रेम करा,
खुर्चीवर प्रेम करा,
परश्या-आर्चीवर प्रेम करा.
एखाद्या काकूबाईपेक्षा,
लवंग्या मिरचीवर प्रेम करा.
प्रेम आघाडीवर करा,
प्रेम युतीवर करा.
प्रेम देहावर करण्यापेक्षा
प्रेम खऱ्या प्रीतीवर करा.
प्रेम फेकशाहीवर करा,
प्रेम ठोकशाहीवर करा,
प्रेम हुकूमशाहीवर करण्यापेक्षा,
प्रेम लोकशाहीवर करा.
प्रेम पक्षावर करा,
प्रेम अपक्षावर करा.
बंडोबा-गुंडोबापेक्षा,
प्रेम नि:पक्षावर करा.
प्रेम दुभंगावर करा,
प्रेम तुकोबाच्या अभंगावर करा.
एका रंगावर करण्यापेक्षा,
इंद्रधनुच्या प्रत्येक रंगावर करा.
प्रेम शिवबावर करा,
प्रेम संभावर करा,
प्रेम उपसुंभावर करण्यापेक्षा ,
लोकशाहीच्या चारही स्तंभावर करा.
खऱ्या अस्मितेवर प्रेम करा,
आपल्या स्वत्त्वावर प्रेम करा.
'विश्वकुटूंबकम'चा नारा देत,
प्रेम राष्ट्रीयत्वावर प्रेम करा.
दगडा-धोंडयावर नको,
सेवाभावावर प्रेम करा.
त्यापेक्षाही जास्त प्रेम,
माणसातल्या देवावर करा,
प्रेम राष्ट्रीय भावनेवर करा,
प्रेम राष्ट्रशक्तीवर करा.
देशाद्रोह्यांचा निषेध करीत,
प्रेम राष्ट्रभक्तीवर करा.
प्रेम राष्ट्रध्वजावर करा,
प्रेम राष्ट्रगीतावर करा.
स्वहिताहून अधिक प्रेम,
राष्ट्रहितावर करा.
प्रेम कलेवर करा,
प्रेम ज्ञानावर करा !
सर्वांहून जास्त,
प्रेम संविधानावर करा!!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------------------
चिमटा-5362
दैनिक पुण्यनगरी
14फेब्रुवारी 2019
----------------------------------------

बिहार पॅटर्न .... मराठी वात्रटिका

  आजची वात्रटिका --------------------- बिहार पॅटर्न जसे कर्म तसे फळ, हे लगेच प्रत्यक्षात आले. महाराष्ट्रात जे कमावले, ते बिहारमध्ये गमावले ग...