Saturday, October 31, 2020

पोल-खोल


 आजची वात्रटिका

------------------------

पोल-खोल

कुणाच्याही दुटप्पीपणावर, कुणीच काही बोलू नका. देवालये खोला म्हणणारे; म्हणतात,विद्यालये खोलू नका.

कोणती मागणी खरी? कोणती मागणी खोटी आहे ? मद्यालयांच्या दारावर, हाऊस फुल्ल ची पाटी आहे !

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ------------------------ फेरफटका-7448 दैनिक झुंजार नेता 31ऑक्टोबर2020

भक्तांचा युक्तीवाद


 आजची वात्रटिका

----------------------------

भक्तांचा युक्तीवाद

मद्यालये मुक्त,विद्यालये मुक्त,
मग देवालयेही मुक्त करा.
सोशल डिस्टनसिंगचे नियम,
अगदी वाट्टेल तेवढे सक्त करा.

आपापल्या आवडी-निवडीची,
ज्याला त्याला नक्की ओढ आहे !
सध्यातरी भक्तांचा युक्तीवाद,
पहिल्यापेक्षा बिनतोड आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5960
दैनिक पुण्यनगरी
31ऑक्टोबर2020
-----------------------------
------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील
आणि दैनिक वात्रटिका
तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील
सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !!
https://suryakantdolase.blogspot.com
--------------------------

Friday, October 30, 2020

कोटा


 आजची वात्रटिका

----------------------------

कोटा

लायकांच्या पाठीत,
नेहमीच सोटा असतो.
तिथे अन्याय ठरलेला,
जिथे कुठे कोटा असतो.

आपल्याला कोट्याची,
आग्रहाने पुर्ती होते!
जिथे भरती व्हावी,
तिथे खोगीरभरती होते !

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7447
दैनिक झुंजार नेता
30ऑक्टोबर2020
------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील
आणि दैनिक वात्रटिका
तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील
सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !!
https://suryakantdolase.blogspot.com
--------------------------

चेकमेट


 आजची वात्रटिका

----------------------------

चेकमेट

याचा त्याला,त्याचा याला, जिथल्या तिथे चेक आहे. पक्षीय राजकारणाची, हीच खरोखर मेख आहे.

तिथे तिथे जाळ होणारच, जिथे कुठे ठिणग्या आहेत ! इंग्रज गेले असले तरी, त्यांच्याच या देणग्या आहेत !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ---------------------------------------- चिमटा-5959 दैनिक पुण्यनगरी 30ऑक्टोबर2020-------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील
आणि दैनिक वात्रटिका
तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील
सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !!
https://suryakantdolase.blogspot.com
--------------------------

Thursday, October 29, 2020

पोटोबा प्रसन्न


 आजची वात्रटिका

----------------------------

पोटोबा प्रसन्न

मंदीर उघडे आहे का बंद? देवाला फरक पडत नाही. तो भक्तीचा भुकेला असूनही, त्याचे भक्तांवाचून अडत नाही.

त्यांची भक्ती उफाळून येते, ज्यांचे देव-देवळांवर पोट आहे ! आस्तिक आणि नास्तिक, ह्या भेदभावातही खोट आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ------------------------ फेरफटका-7446 दैनिक झुंजार नेता 29ऑक्टोबर2020
------------------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील
आणि दैनिक वात्रटिका
तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील
सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !!
https://suryakantdolase.blogspot.com
----------------------------

ऐतिहासिक विकृती...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------- ऐतिहासिक विकृती एकीकडे खोट्या इतिहासाशी, खऱ्या इतिहासाचे लढणे चालू आहे. दुसरीकडे विकृत इतिहासाच्या, व...