Thursday, October 8, 2020

कोरोना अलर्ट

आजची वात्रटिका
 ---------------------

कोरोना अलर्ट

असाही पसरतो आहे,
तसाही पसरतो आहे. 
कोरोना कोरोना आहे, 
कसाही पसरतो आहे. 

एकीकडे पसरतो आहे, 
दुसरीकडे ओसरतो आहे. 
कोरोनाचा नेम नाही, 
हे नेमके विसरतो आहे. 

फसवणूकीपासून सावधान, 
कोरोना फसवा आहे ! 
त्यांच्यापासूनही सावधान, 
जो बाजारबसवा आहे !! 

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269
 ---------------------------------------- चिमटा-5938
दैनिक पुण्यनगरी 
8ऑक्टोबर2020

No comments:

daily vatratika...3april2025