Thursday, September 30, 2021

कवितेचे इंटरनेट... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

कवितेचे इंटरनेट

पायलीचे पन्नास झाले,
सतराशे साठ झाले.
खमके सोडून यमके,
कविलोक भाट झाले.

लाईक्स वरून लायकी,
इम्प्रेशनला थम्बआहे.
कॉपी-पेस्ट सोपे झाले,
कवितेची बोंब आहे.

मीडियाच्या माध्यमातून,
आज कविता सोशल आहे !
जी काळजात टॅग होते,
तीच कविता स्पेशल आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7719
दैनिक झुंजार नेता
30सप्टेंबर 2021

 

आयात निर्यात.. मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

आयात निर्यात

कुठे जातोय तडा,
कुठे प्रचंड अशी भेग आहे.
पक्षीय आयात-निर्यातीला,
प्रचंड असा वेग आहे.

पक्षीय आयात-निर्यातीला,
ना नियम, ना बंधन आहे !
उगवत्या सूर्याला,
सर्वांकडूनच वंदन आहे !!
-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6279
दैनिक पुण्यनगरी
30सप्टेंबर 2021

 

Wednesday, September 29, 2021

कोरोना श्री...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

कोरोना श्री

गाळलेल्या सगळ्या जागा,
राजकारणी भरीत राहिले.
लॉक डाऊन च्या काळात,
लोकरंजन करीत राहिले.

राजकारण्यांचे लोकरंजन,
जसे टॅक्स फ्री होते,
तसेच ते टेन्शन फ्री होते!
कुणी होते कोरोना योद्धे,
कुणी 'कोरोना श्री' होते!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------
फेरफटका-7718
दैनिक झुंजार नेता
29सप्टेंबर 2021

 

कन्हैयाचा 'नटखट'पणा.. मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

कन्हैयाचा 'नटखट'पणा

बोलता-बोलता कन्हैया,
भलताच नटखट निघाला.
पक्षांतराचा वाटेवरती,
भलताच पटपट निघाला.

खडकाला धडका नकोत,
जणू हाच 'लाल बावटा'आहे!
रोखून रोखून रोखणार किती?
निमित्ताला फक्त पावटा आहे !!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6278
दैनिक पुण्यनगरी
29सप्टेंबर 2021

 

Tuesday, September 28, 2021

अटक वॉरंट वॉर्ड...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

अटक वॉरंट वॉर्ड

कायद्याच्या वाटा-पळवाटावर,
सगळेच सोकायला लागले.
अटक वॉरंट निघताच,
प्रत्येकाचेच दुखायला लागले.

दुखणे खरे की खोटे?
यात ज्याचे त्याने पडले पाहिजे!
प्रत्येक सरकारी दवाखान्यात,
अटक वॉरंट वॉर्ड काढले पाहिजे !!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6277
दैनिक पुण्यनगरी
28सप्टेंबर 2021

 

जी.एस. टी....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------
जी.एस. टी.
जी.एस. टी.चा सासेमिरा,
सगळीकडेच लागला आहे.
जी.एस. टी. चा आकडा,
त्यामुळेच तर फुगला आहे.
जी.एस. टी. चा आकडा,
पावतीवर साकारला जातो !
अगदी हागल्या मुतल्यावरही,
जी.एस.टी.आकारला जातो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7717
दैनिक झुंजार नेता
28सप्टेंबर 2021

 

Monday, September 27, 2021

गुलाब: एक वादळ.. आजची वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

गुलाब: एक वादळ

भीती न वादळांची,
वादळांचा सराव आहे.
मस्ती आणि दोस्तीचा,
वादळांशी ठराव आहे.

रोज नवे वादळ,
हल्ली माझ्या कवेत आहे.
वादळ म्हणजे काय?
बदल फक्त हवेत आहे.

आले किती? गेले किती?
वादळांची ये-जा आहे !
नाव 'गुलाब 'असेल तर,
अंगावर घेण्यात मजा आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------
फेरफटका-7716
दैनिक झुंजार नेता
27सप्टेंबर 2021

 

DAILY VATRATIKA...27APRIL2024