Sunday, February 28, 2021

दैनिक वात्रटिका 28फेब्रुवारी2021

दैनिक वात्रटिका
28फेब्रुवारी2021
अंक डाऊनलोड लिंक

 

वैज्ञानिक दृष्टीकोन


 

नॉन स्टॉप धमाका


 

शाळाप्रिय कोरोना


 आजची वात्रटिका

----------------------

शाळाप्रिय कोरोना

शाळांच्या मुळावरती
कोरोनाचे चाळे आहेत.
शाळा नीट उघडेपर्यंत,
पुन्हा नव्याने टाळे आहेत.

आंदोलने, सभा,लग्न,
यांच्याकडे मात्र पाठ आहे!
आतुरलेल्या लेकरांच्या,
भविष्याची वाट आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-6074
दैनिक पुण्यनगरी
28फेब्रुवारी2021

Saturday, February 27, 2021

दैनिक वात्रटिका 27फेब्रुवारी2021

दैनिक वात्रटिका
27फेब्रुवारी2021
अंक डाऊनलोड लिंक

 

समानता

आजची वात्रटिका

----------------------

समानता

कायद्याची जाहीर टवाळी,
कायद्याची टिंगल आहे.
कायद्याच्या तमाशासोबत,
दंगलसुद्धा मंगल आहे.

धनदांडग्यांच्या पायाशी,
कायद्याचे इमान आहे !
फक्त न्यायालयाच्या भिंतीवर,
कायदा सर्वांना समान आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------------
फेरफटका-7549
दैनिक झुंजार नेता
27फेब्रुवारी2021

 

दैनिक वात्रटिका 26फेब्रुवारी2021

दैनिक वात्रटिका
26फेब्रुवारी2021
अंक डाऊनलोड

 

Friday, February 26, 2021

ग्राऊंड रिॲलिटी

आजची वात्रटिका
----------------------

ग्राऊंड रिॲलिटी

अहमदाबाद कसोटी,
जणू ट्वेन्टी-ट्वेन्टी आहे.
बडा घर पोकळ वासा,
ही 'ग्राऊंड रिॲलिटी' आहे.

आमच्यासाठी गोड,
इंग्लंड साठी नमकीन हैं !
भक्त पुन्हा म्हणू लागले,
मोदी हैं तो,
सब मुमकीन हैं !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6072
दैनिक पुण्यनगरी
26फेब्रुवारी2021

 

दैनिक वात्रटिका 25फेब्रुवारी2021

दैनिक वात्रटिका
25फेब्रुवारी2021
अंक डाऊनलोड

 

Thursday, February 25, 2021

शतकीय वाटचाल

आजची वात्रटिका
----------------------

शतकीय वाटचाल

लोकांनाच्या राड्यानंतर,
कोरोनाचा राडा आहे.
दशकाच्या पाढयानंतर,
शतकाचा पाढा आहे.

तरीही लोकांना कोरोनाचे,
कुठे सोयरसुतक आहे !
आता सर्वत्र कोरोनाचे,
शतकामागे शतक आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------------
फेरफटका-7539
दैनिक झुंजार नेता
25फेब्रुवारी2021

 

कोरोनाचे हास्य

आजची वात्रटिका
----------------------
कोरोनाचे हास्य
एकतर सत्तेची मस्ती,
किंवा लोकप्रियतेचा माज आहे.
जे लोकांना दिसले,
ते तर जंगल राज आहे.
आडातच नव्हते तर,
पोहऱ्यात आलेच कसे !
सगळा गडबड गोंधळ बघून,
कोरोना गालातल्या गालात हसे!!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6071
दैनिक पुण्यनगरी
25फेब्रुवारी2021

 

दैनिक वात्रटिका 24फेब्रुवारी2021

दैनिक वात्रटिका
24फेब्रुवारी2021
अंक डाऊनलोड लिंक

 

Wednesday, February 24, 2021

यदाकदाचित

आजची वात्रटिका
----------------------

यदाकदाचित

राजकारणाची कोरोनावर,
केंव्हाच मात आहे.
तरी बरे अजून आरोप नाहीत,
यात विरोधकांचा हात आहे.

कोरोना असेल तोपर्यंत,
राजकारण खेळून होईल !!
असे आरोप झाले तर,
कोरोनाही पळून जाईल !

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7538
दैनिक झुंजार नेता
24फेब्रुवारी2021

 

झुंडशाही

आजची वात्रटिका
----------------------

झुंडशाही

सज्जन वाटणारी जनता,
जेंव्हा आडदांड होते.
तेंव्हा साधी गर्दीही,
अचानकपणे झुंड होते.

झुंडगर्दी आणि गुंडागर्दी,
दोघांनाही मग बहर येतो !
न्यायाचा मुडदा पडून,
अन्यायाचा कहर होतो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6070
दैनिक पुण्यनगरी
24फेब्रुवारी2021

 

Tuesday, February 23, 2021

दैनिक वात्रटिका 23फेब्रुवारी2021

दैनिक वात्रटिका
23फेब्रुवारी2021
अंक डाऊनलोड लिंक

 

चटक

आजची वात्रटिका
----------------------
चटक
मंत्री आणि मंत्रालय,
कोरोनाने बाधित आहे.
विरोधकांचा आरोप,
सरकार डाव साधीत आहे.
विरोधकांना वाटते,
सरकारचे नाटक आहे !
जणू कोरोनालाही ,
राजकारणाची चटक आहे!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
दैनिक वात्रटिका
23फेब्रुवारी2021

नाईट कर्फ्यू

आजची वात्रटिका
----------------------

नाईट कर्फ्यू

बेजबाबदार कोण?
विचारा जरा स्वतःला.
रात्रीची संचारबंदी कशाला?
हडळ म्हणाली भूताला.

दिवसाबरोबर रात्रीच्याही,
स्वैराचाराला उत आहे !
हडळीशी सहमत,
कोरोनाचे भूत आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
दैनिक वात्रटिका
23फेब्रुवारी2021

 

ऐतिहासिक विकृती...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------- ऐतिहासिक विकृती एकीकडे खोट्या इतिहासाशी, खऱ्या इतिहासाचे लढणे चालू आहे. दुसरीकडे विकृत इतिहासाच्या, व...