Sunday, January 31, 2021

सांगा,अण्णा कुणाचे?

आजची वात्रटिका
----------------------------

सांगा,अण्णा कुणाचे?

कुणाला आपले वाटू लागले, कुणाला परके वाटू लागले. सांगा अण्णा नेमके कुणाचे? शाब्दिक बाण सुटू लागले.

प्रत्येकाचे वेगवेगळे उत्तर, जशी ज्याची त्याची बुद्धी आहे ! उपोषणाच्या तंत्रा-मंत्राची, राळेगणला मात्र सिद्धी आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ---------------------------------------- चिमटा-6047 दैनिक पुण्यनगरी 31जानेवारी2021

 

दैनिक वात्रटिका 30जानेवारी2021

दैनिक वात्रटिका
30जानेवारी2021
डाऊनलोड लिंक-

 

लालेलाल

आजची वात्रटिका
----------------------------

लालेलाल

आपली कशी आहे? हे आपणच पक्के जाणतो. तरीही तू माझी लाल म्हण, मीही तुझी लाल म्हणतो.

ज्याच्या त्याच्या कौतुकाची, ही कौतुकास्पद चाल आहे ! एकूणच सगळा कार्यक्रम, फक्त लाल एके लाल आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ------------------------------------- फेरफटका-7511 दैनिक झुंजार नेता 31जानेवारी2021

 

Saturday, January 30, 2021

अयोध्या वारी

आजची वात्रटिका
----------------------------

अयोध्या वारी

राजकीय वारे फिरल्याबरोबर, अयोध्येच्या वाऱ्या वाढू लागल्या. वैचारिक फेरबदल एवढे की, अयोध्येच्या फेऱ्या वाढू लागल्या.

लोकांना राजकारणच दिसते, कदाचित हा भक्तीभाव असू शकतो! उद्याच्या राजकारणाचा, कदाचित हा नवा डाव असू शकतो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ---------------------------------------- चिमटा-6046 दैनिक पुण्यनगरी 30जानेवारी2021

 

Friday, January 29, 2021

दैनिक वात्रटिका 29जानेवारी2021

दैनिक वात्रटिका
29जानेवारी2021
डाऊनलोड लिंक

 

कौशल्य

आजची वात्रटिका
----------------------------
कौशल्य
शिव्याही ओव्या वाटतात,
ओव्याही शिव्या वाटतात.
म्हणूनच राजकीय नेत्यांना,
द्याव्या आणि घ्याव्या वाटतात.
बरेच काही खाऊन खाऊन,
ते शिव्या-ओव्या पचवू शकतात !
लोकांना आपल्या तालावर,
ते कसेही नाचवू शकतात !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7509
दैनिक झुंजार नेता
29जानेवारी2021

 

भुतावळ

आजची वात्रटिका
----------------------------
भुतावळ
काही काही प्रश्न असे की,
जे कधीच सुटले नाहीत.
भूतं बनून मागे लागले तरी,
ते कधीच खुटले नाहीत.
जुन्याच प्रश्नांची भुतावळ,
राहून राहून अंगात येते !
उतारा कुणाकडेच नसल्याने,
मग राजकारण रंगात येते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6045
दैनिक पुण्यनगरी
29जानेवारी2021

 

दैनिक वात्रटिका अंक 92 वा

दैनिक वात्रटिका
अंक 92 वा
28जानेवारी2021
डाऊनलोड लिंक
 

Thursday, January 28, 2021

आपली कृषिप्रधानता

आजची वात्रटिका
----------------------------

आपली कृषिप्रधानता

हे पोकळ विधान नाही, हे आमचे निदान आहे. देश कृषिप्रधान असल्याने, राजकारण कृषिप्रधान आहे.

खोटे कौतुक केले जाते, तो जगाचा पोशिंदा आहे. खेळवण आणि बोळवण, हाच राजकीय धंदा आहे.

या देशात शेतकऱ्यांचा, अजून कुणीच खरा वाली नाही ! त्यांच्या उज्वल भविष्याची, अजून तरी पेरणी झाली नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ---------------------------- चिमटा-6044 दैनिक पुण्यनगरी 28जानेवारी2021

 

शाळा

आजची वात्रटिका
----------------------------
शाळा
पुन्हा आला खडू,
पुन्हा आला फळा.
पुन्हा एकदा सुरू,
वास्तवातली शाळा.
गहिवरले विद्यार्थी,
गहिवरल्या शाळा.
शाळेच्या प्रांगणात
आनंदाचा मेळा.
पालकांनी एकदाचे
मोकळे सोडले श्वास !
सुट्टी नको,शाळा हवी,
नवे हट्ट,नवी आस!!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------------
फेरफटका-7508
दैनिक झुंजार नेता
28जानेवारी2021

 

Tuesday, January 26, 2021

दैनिक वात्रटिका अंक 91 वा

दैनिक वात्रटिका
अंक 91 वा
26जानेवारी2021
अंक डाऊल्लोड

 

कोरोनासत्ताक दिन

आजची वात्रटिका
----------------------------

कोरोनासत्ताक दिन

सोशल डिस्टन्सिंगमुळे, स्वातंत्र्य भुर्रर्र पळाले आहे. स्वातंत्र्याचे महत्त्व, कोरोनामुळे कळाले आहे.

प्रजासत्ताक दिनाचाही कोरोनासत्ताक दिन आहे ! स्वैराचाऱ्यांच्या फुग्याला, ही नैसर्गिक पिन आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ---------------------------- चिमटा-6043 दैनिक पुण्यनगरी 26जानेवारी2021

 

पुरस्कार

आजची वात्रटिका ---------------------------- पुरस्कार

जेवढा होतो आनंद, तेवढाच त्रास होतो. शासकीय पुरस्कारांना, कसला तरी वास येतो.

वास तर येतोच येतो, त्याला रंगही असतो ! स्वप्नपूर्ती बरोबर, अपेक्षाभंगही असतो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ------------------------------------- फेरफटका-7507 दैनिक झुंजार नेता 26जानेवारी2021

 

Monday, January 25, 2021

दैनिक वात्रटिका अंक 90 वा

दैनिक वात्रटिका
अंक 90 वा
25जानेवारी2021
डाऊनलोड लिंक

 

दैनिक वात्रटिका 24जानेवारी2021 कवितेचा धंदा

दैनिक वात्रटिका
24जानेवारी2021
अंक डाऊनलोड

 

वैज्ञानिक प्रयोग

आजची वात्रटिका
----------------------------
वैज्ञानिक प्रयोग
टळू दे वाद-विवाद,
जळू दे सारे अज्ञान.
टाळ्या पिटत पिटत,
मराठीला बोले विज्ञान.
निवडीपेक्षा नियुक्ती,
ही तर्कशुद्ध युक्ती आहे.
आता सिद्ध होऊ दे,
माझ्यावर भक्ती आहे.
प्रयोगातून विज्ञानाचे,
पुन्हा पुन्हा योग येवोत !
मराठी साहित्यात,
वैज्ञानिक प्रयोग होवोत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-6042
दैनिक पुण्यनगरी
25जानेवारी2021

 

जयंत नारळीकर

आजची वात्रटिका
----------------------------

जयंत नारळीकर

ग्रहमान चांगले सांगतो खगोल. हरकला इतिहास, थरथरला भूगोल.

जिथे फक्त वाद होतो, तिथे विज्ञानवाद आहे ! विज्ञानाला मराठीची, अध्यक्षीय दाद आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ------------------------------------- फेरफटका-7506 दैनिक झुंजार नेता 25जानेवारी2021

 

Sunday, January 24, 2021

दमछाक

आजची वात्रटिका
----------------------------
दमछाक
नेत्यांची घसरते जीभ,
कारण ते घसराळू असतात.
लोकही विसरून जातात,
कारण ते विसराळू असतात.
घसराळू आणि विसराळूची,
पक्की जोड जमली आहे!
आंधळी कोशिंबीर खेळून,
जनता पार दमली आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------------
फेरफटका-7505
दैनिक झुंजार नेता
24जानेवारी2021

 

भविष्यवाणी ... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका --------------------- भविष्यवाणी अजूनही या प्रश्नांची उत्तरे, कुणालाच मिळाले नाहीत. जगाचे भविष्य सांगणाऱ्यांना, स्वतःचे मृत्...