Monday, January 11, 2021

कोरोना स्कूल

आजची वात्रटिका
------------------------
कोरोना स्कूल
छडी लागे छम छम,
इतिहासजमा गाणे झाले.
ऑनलाईन शिक्षणाने,
मोबाईलचे सोने केले.
मोबाईल झाला शाळा,
मोबाईलच गुरू आहेत.
शिक्षण ते प्रौढ शिक्षण,
सगळे वर्ग सुरु आहेत.
ज्याचे होते,त्याचेच चालू,
वंचित वर्ग वंचित आहे !
लाईव्ह असूनही जिवंत नाही,
हे ऑनलाईनचे संचित आहे!!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-6028
दैनिक पुण्यनगरी
11जानेवारी2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका25एप्रिल2024....वर्ष- तिसरे..

दैनिक वात्रटिका 25एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -323 वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1Lj6fYs7HXzulsl3-eEaC...