Wednesday, July 11, 2012

मान्सून ऑफर

युज अँण्ड थ्रो
असा पाण्याचा वापर आहे.
पाणी अडवा, पाणी जिरवा
निसर्गाची 'मान्सून ऑफर' आहे.


निसर्गाची मान्सून ऑफर
आपल्याला कळत नाही!
खडकाला धडका मारल्या तरी
आपल्याला पाणी मिळत नाही!!


- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Tuesday, July 10, 2012

दहशतवादाचा गुंता


धक्क्यावर धक्का बसावा
असा खुलासा केला आहे.
अबू जिंदाल म्हणतो,
अबू हमजा केव्हाच मेला आहे

चेहर्‍यावर चेहरे,
चेहर्‍यामागेही चेहरे आहेत.
जिंदाल काय? हमजा काय?
पटावरचे मोहरे आहेत.

प्रश्नावर प्रश्न, शंकावर शंका
खरे उत्तर मिळत नाही !
द्वेषाने द्वेष वाढतो,
प्रेमाची भाषाही कळत नाही!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Wednesday, July 4, 2012

स्टंटबाजी

'गुरु'त्वाकर्षण

गिर्‍हाइकांची गर्दी बघून
वाट्टेल ते धंदे सुरू झाले.
ज्यांची शिष्य व्हायची लायकी नाही
असेसुद्धा गुरू झाले.

आपण कितीही डोळे उघडा
शिष्यांची गुरूवर भक्ती आहे!
शिष्यांचा वेडपटपणा
गुरूंची गुरुत्वाकर्षण शक्ती आहे!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

कोरोना युग