Monday, July 31, 2023

दैनिक वात्रटिका31जुलै2023....वर्ष- तिसरे....अंक - 57 वा

दैनिक वात्रटिका
31जुलै2023....वर्ष- तिसरे....अंक - 57 वा
अंक डाऊनलोड लिंक-

प्रेरणा आणि धारणा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

प्रेरणा आणि धारणा

एखाद्याच्या फायद्यासाठी,
दुसऱ्याला बदनाम करणे बरे नाही.
प्रेरणेच्या नावाखाली,
कुणाला नाउमेद करणे खरे नाही.

प्रेरणा ही प्रेरणाच असावी,
कुणाची कसोटी वा परीक्षा बघू नये.
माया गायीची दाखवून,
करणी मात्र कसायाची निघू नये.

शंका आणि कुशंकांचे प्रश्न,
पत्रिके पत्रिकेवर छापील आहेत !
असा मात्र गैरसमज नको,
शांत आहेत म्हणजे गाफील आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8316
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
31जुलै जून2023
 

किडेशास्त्र....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

 आजची वात्रटिका

-------------------------
किडेशास्त्र
कुणाच्या पोटात किडे असतात,
कुणाच्या डोक्यात किडे असतात.
जसे कुणाच्या मागे किडे असतात,
तसे किडे कुणाच्या पुढे असतात.
जेव्हा पोटातले आणि डोक्यातले,
किडे जरा जास्तच वळवळू लागतात.
तेव्हा कुणाच्या कुठे कुठे किडे आहेत ?
ते अगदी ठळकपणे कळू लागतात.
डोक्यात असोत वा आणखी कुठे,
किडे मग गैरफायदा घेऊ लागतात !
प्रश्न तेव्हा बिकट होऊ लागतो,
जेव्हा किडे ओठावर येऊ लागतात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6879
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
31जुलै2023

Sunday, July 30, 2023

दैनिक वात्रटिका30जुलै2023....वर्ष- तिसरे....अंक - 56 वा


दैनिक वात्रटिका
30जुलै2023....वर्ष- तिसरे....अंक - 56 वा
अंक डाऊनलोड लिंक-

 

भारत-पाक संबंध...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

भारत-पाक संबंध

पूर्वी फक्त घुसखोऱ्या गाजायच्या,
आता लव्ह स्टोऱ्या गाजत आहेत.
गाजलेल्या लव्हस्टोऱ्यातूनही म्हणे,
पुन्हा कटकारस्थानेच शिजत आहेत.

प्रेमासाठी वाट्टेल ते म्हणीत,
प्रेमवेड्यांची आवक जावक आहे.
बॉर्डर - बिर्डर गळून पडल्या,
प्रेम हाच देव,प्रेम हेच देवक आहे.

ऑनलाइन प्रेमाच्या खेळात,
कुणाचा मेंदू आणि खिसाही साफ आहे !
कुढत रहा....लढत रहा,
प्रेमात आणि युद्धात सगळे माफ आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6878
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
30जुलै2023
 

उपेक्षेचे दाखले....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

उपेक्षेचे दाखले

कुणाला झिजवले जाते,
कुणाला कुजवले जाते.
दगडालाही शेंदूर फासून,
कधी कधी उजवले जाते.

कुणाकडे असते धमक,
कुठे उत्साह रगड असतो.
दगडच उजवला जातो,
कारण तो दगड असतो.

खुजे उंच केले जातात,
उंच खुजे केले जातात !
लायकांना तळतळत ठेवून,
त्यांचे भजे केले जातात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8315
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
30जुलै जून2023
 

Saturday, July 29, 2023

दैनिक वात्रटिका29जुलै2023....वर्ष- तिसरे....अंक - 55 वा


दैनिक वात्रटिका
29जुलै2023....
वर्ष- तिसरे....अंक - 55 वा
अंक डाऊनलोड लिंक-
 

भेकडांचा धर्म...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

भेकडांचा धर्म

भेकडांना घाबरवले की,
एकत्र सारे भेकड होतात.
केलेल्या इशाऱ्यावर नाचणारे,
सारे भेकड माकड होतात.

भेकडांची आणि मूर्खांची,
सर्वात लवकर एकी होते.
हम सब एक है..
नारेबाजी आणि शेखी होते.

भित्यापोटी ब्रह्मराक्षस,
अगदीच ठरलेला असतो !
भेकडांच्या हाती मग,
पळवाटांचा मार्ग उरलेला असतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8314
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
29जुलै जून2023
 

बंडाची प्रेरणा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

बंडाची प्रेरणा

आमच्यात या;नसतात तुरुंगात जा,
असे भाजपाकडून ऑप्शन आहे.
म्हणूनच बळजबरीच्या रामरामाला,
आजकाल बंड नावाची कॅप्शन आहे.

आजकालचे एक तरी बंड दाखवा,
जे आतल्या आवाजातून सुचले आहे.
बंडखोरांचे एक मात्र चांगले झाले,
ब्रह्मचर्यासोबत गाढवही वाचले आहे.

वाचलो बुवा एकदाचे,
अशीच बंडखोरणांची धारणा आहे !
त्यामुळेच जुन्या बंडखोरांची,
नव्या बंडखोरांना बंडाची प्रेरणा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6877
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
29जुलै2023
 

Friday, July 28, 2023

दैनिक वात्रटिका28जुलै2023....वर्ष- तिसरे....अंक - 54 वा


दैनिक वात्रटिका
28जुलै2023....वर्ष- तिसरे....अंक - 54 वा
अंक डाऊनलोड लिंक-
 

उधारीचा धंदा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

उधारीचा धंदा

नेता हा नेता असतो,
कार्यकर्ता हा कार्यकर्ता असतो.
आपल्या लाचारीचा,
कार्यकर्ताच कर्ता धर्ता असतो.

आपल्या लाचारीलाच,
कार्यकर्ता निष्ठा म्हणत असतो.
आपली कट्टरतेची मर्यादा,
कार्यकर्ता पक्की जाणत असतो.

जसा तो खंदा असतो;बंदा असतो,
तसा कार्यकर्ता अंधा असतो !
कार्यकर्त्याचे आयुष्यात उधारीवर,
असाच सगळा धंदा असतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8313
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
28जुलै जून2023
 

पारंपरिक संघर्ष...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

पारंपरिक संघर्ष

काका - पुतण्याच्या मतभेदाने,
राजकारणाला ग्रासलेले आहे.
कधी काकाने पुतण्याला तर,
पुतण्याने काकाला त्रासलेले आहे.

जिथे कुठे पुतण्या आणि काका,
तिथे राजकीय प्रसंग बाका आहे.
दोघांचाही एकमेकांना,
अगदी हमखासच धोका आहे.

इतिहासापासून वर्तमानापर्यंत,
याचे दाखलेच दाखले आहेत !
इतिहासाची पुनरावृत्ती करायला,
भविष्यानेही पावलं टाकले आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6875
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
28जुलै2023
 

Thursday, July 27, 2023

दैनिक वात्रटिका27जुलै2023....वर्ष- तिसरे.... अंक - 53 वा


दैनिक वात्रटिका
27जुलै2023....वर्ष- तिसरे....    अंक - 53 वा
अंक डाऊनलोड लिंक-

 

शोधा म्हणजे सापडेल...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

शोधा म्हणजे सापडेल

माना डोलकर व थुंकी झेलकर,
यांचीच आजकाल चांदी आहे.
याचे खरे कारण हेही असू शकते,
मजबूरी का नाम गांधी आहे.

सदा वाके आणि लाळू पायचाटे,
सगळे एकाच माळेचे मणी आहेत.
गोंडोजी घोळे, मेंढोजी बिनडोके,
माळेत अजून कुणी कुणी आहेत.

सर्डोजी रंगबदले यांची तर,
फकत कुंपणापर्यंतच धाव आहे !
माळेत तुम्हीही भर घालू शकता,
यात अजून कुणाकुणाचे नाव आहे?

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8312
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
27जुलै जून2023
 

आवाज कुणाचा?...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

आवाज कुणाचा?

त्यांचीच मुलाखत आहे,
त्यांचाच मुलाखतकार आहे.
आपलेच प्रश्न;आपलीच उत्तरं,
हेच 'पॉडकास्ट'चे सार आहे.

जुन्याच मॅरेथॉन मुलाखतीचा,
जणू हा नवा अवतार आहे.
आवाज कुणाचा ?
हा प्रश्नच तसा मजेदार आहे.

त्यांचे प्रश्नही रोकडे आहेत,
त्यांचे उत्तरंही रोकडे आहेत!
आपणच शोधाशोध करायची,
नेमके कुठे कुठे खेकडे आहेत?

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6875
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
27जुलै2023
 

Wednesday, July 26, 2023

दैनिक वात्रटिका26जुलै2023....वर्ष- तिसरे....अंक - 52 वा


दैनिक वात्रटिका
26जुलै2023....वर्ष- तिसरे....अंक - 52 वा
अंक डाऊनलोड लिंक-
 

चार दिवसाचा पावसाळा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

चार दिवसाचा पावसाळा

कधी कधी कोसळतो धो धो,
एरव्ही पावसाळाच बॅन आहे.
आजकाल जणू पाऊसही,
ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटचा फॅन आहे.

वाढत्या ग्लोबल वॉर्मिंगची,
पावसाकडून वॉर्निंग बेल आहे.
हवामान तज्ञापासून वेधशाळेपर्यंत,
हल्ली प्रत्येक जणच फेल आहे.

हल्ली चार दिवसाचा पावसाळा,
बाकी सगळाच तर उन्हाळा आहे!
धाबे दणाणल्याची चाहूल,
प्रत्येक पन्हाळा पन्हाळा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
दैनिक वात्रटिका
वर्ष -3रे
26जुलै जून2023
 

जागृत सोंगाडे..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

जागृत सोंगाडे

कधी कधी गाढ झोपलेले लोकही,
जागेपणाचे सोंग करू लागतात.
दुनियाच सोंगा ढोंगाची असल्याने,
तेही जागेपणाचे ढोंग करू लागतात.

जागेपणाचा आव आणला तरी,
लोक डुलक्या देत देत पेंगत असतात.
सगळे काही कळून वळूनही,
तान्ह्या बाळासारखे रांगत असतात.

जसे झोपेचे सोंग घेतलेल्यांना,
कधीच जागे करता येत नाही !
तसे जागेपणाचे सोंग घेतलेल्यांनाही,
अजिबातच गृहीत धरता येत नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6874
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
26जुलै2023
 

Tuesday, July 25, 2023

दैनिक वात्रटिका25जुलै2023....वर्ष- तिसरे....अंक - 51 वा


दैनिक वात्रटिका
25जुलै2023....वर्ष- तिसरे....अंक - 51 वा
अंक डाऊनलोड लिंक-

चाणक्य नीति...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

चाणक्य नीति

भावी मुख्यमंत्र्यांच्या यादीची,
नको तेवढी लांबी आहे.
नव्या मुख्यमंत्र्याच्या पाळण्याला,
आता एकदाची तांबी आहे.

जशी तांबी आहे;लांबी आहे,
तशी जोरदार अशी तंबी आहे.
बाजारात तुरी अन्,
वरणासाठी झोंबाझोंबी आहे.

इच्छुकांची बोलती बंद,
समर्थकांची तोंडावर आपटी आहे !
राजकीय कुजबुज ऐकू येतेय,
आजचा चाणक्य कपटी आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8311
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
25जुलै जून2023
 

चौकशी समिती....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

चौकशी समिती

लाथाळ्या आणि वेळकाढूपणा,
हे चौकशी समितीचे जनक असतात.
मुदतवाढ आणि पुनर्रचना,
हे चौकशी समितीचे मानक असतात.

चौकशी समिती स्थापण्यामागचे,
कारणही बेरकी आणि धोरणी असते.
विरोधकांनी बोंबाबोब केली तरी,
समितीवर बगलबच्च्यांची वर्णी असते.

समिती मागे समिती जन्माला येते,
समितीला नको तेवढे फाटे असतात.
जसे बरेच अहवाल फिक्स,
तसे बरेच अहवाल वांझोटे असतात.

प्रकरण कितीही नवे असले तरी,
पुन्हा जुनीच मळवाट धुंडाळली जाते !
एकदा प्रकरण विस्मृतीत गेले की,
चौकशी समितीही गुंडाळली जाते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
चिमटा-6873
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
25जुलै2023
 

Monday, July 24, 2023

पैशाचा पाऊस... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

आजची वात्रटिका
-------------------------

पैशाचा पाऊस

अधून मधून पुरोगामी महाराष्ट्रात,
पैशाच्या पावसाचे प्रयोग केले जातात.
पैशाचा पाऊस काही पडत नाही,
त्यासाठी नरबळी मात्र दिले जातात.

पैशाचा पाऊस कधी पडत नसतो,
पैशाचा पाऊस कशी पडला नाही !
पैशाचा पाऊस कधी पडणार नाही,
तरीही हा  मूर्खपणा सोडला नाही!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------
चिमटा-6872
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
24जुलै2023
-----------------------------------
मराठी वात्रटिका
*विशेष सूचना-*
1)माझ्या वात्रटिकात काही आक्षेपार्ह वाटले तर माझ्या मूळ पोस्ट तपासाव्यात किंवा प्रत्यक्ष संपर्क साधून खात्री करा.
२)सदरील वात्रटिकमध्ये काही टायपिंग मिस्टेक असेल तर मला कळवा.
३) वैयक्तिक अभिप्रायाचे स्वागत.
जे वात्रटिका शेअर करत आहेत त्यांचे विशेष आभार.
4) माझ्या प्रसिद्ध असलेल्या 18 हजारांपेक्षा जास्त वात्रटिका 8 हजार पेक्षा जास्त वात्रटिका एका क्लिकवर वाचू शकता
https://suryakantdolase.blogspot.com/?m=1
५) माझ्या बाल वात्रटिका वाचण्यासाठी क्लिक करा
https://balsuryakanti.blogspot.com
६) सर्व काही एकाच ठिकाणी...एकाच ठिकाणी !! अर्थात *सप्ताहिक* *सूर्यकांती* खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पाहिले आणि एकमेव साप्ताहिक https://weeklysuryakanti.blogspot.com
7) माझ्या *सूर्यकांती लाईव्ह* किंवा यूट्यूब चॅनलला कृपया भेट द्या...लाईक करा...*सबस्क्राईब* करा !! https://www.youtube.com/user/suryakantdolase
8 )आजपर्यंतचे सर्व वात्रटिका संग्रह डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा
https://vatratikaebooks.blogspot.com
९)माझ्या शेकडो कविता वाचण्यासाठी क्लिक करा
https://surykanti.blogspot.com
१०) माझ्या विडंबन कविता वाचण्यासाठी किलक करा
https://suryakanti1.blogspot.com
प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-सूर्यकांत डोळसे
23जुलै जून2023

अधून मधून पुरोगामी महाराष्ट्रात,
पैशाच्या पावसाचे प्रयोग केले जातात.
पैशाचा पाऊस काही पडत नाही,
त्यासाठी नरबळी मात्र दिले जातात.

पैशाचा पाऊस कधी पडत नसतो,
पैशाचा पाऊस कशी पडला नाही !
पैशाचा पाऊस कधी पडणार नाही,
तरीही हा  मूर्खपणा सोडला नाही!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------
चिमटा-6872
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
24जुलै2023
-----------------------------------
मराठी वात्रटिका
*विशेष सूचना-*
1)माझ्या वात्रटिकात काही आक्षेपार्ह वाटले तर माझ्या मूळ पोस्ट तपासाव्यात किंवा प्रत्यक्ष संपर्क साधून खात्री करा.
२)सदरील वात्रटिकमध्ये काही टायपिंग मिस्टेक असेल तर मला कळवा.
३) वैयक्तिक अभिप्रायाचे स्वागत.
जे वात्रटिका शेअर करत आहेत त्यांचे विशेष आभार.
4) माझ्या प्रसिद्ध असलेल्या 18 हजारांपेक्षा जास्त वात्रटिका 8 हजार पेक्षा जास्त वात्रटिका एका क्लिकवर वाचू शकता
https://suryakantdolase.blogspot.com/?m=1
५) माझ्या बाल वात्रटिका वाचण्यासाठी क्लिक करा
https://balsuryakanti.blogspot.com
६) सर्व काही एकाच ठिकाणी...एकाच ठिकाणी !! अर्थात *सप्ताहिक* *सूर्यकांती* खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पाहिले आणि एकमेव साप्ताहिक https://weeklysuryakanti.blogspot.com
7) माझ्या *सूर्यकांती लाईव्ह* किंवा यूट्यूब चॅनलला कृपया भेट द्या...लाईक करा...*सबस्क्राईब* करा !! https://www.youtube.com/user/suryakantdolase
8 )आजपर्यंतचे सर्व वात्रटिका संग्रह डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा
https://vatratikaebooks.blogspot.com
९)माझ्या शेकडो कविता वाचण्यासाठी क्लिक करा
https://surykanti.blogspot.com
१०) माझ्या विडंबन कविता वाचण्यासाठी किलक करा
https://suryakanti1.blogspot.com
प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-सूर्यकांत डोळसे
23जुलै जून2023

दैनिक वात्रटिका 24जुलै2023....वर्ष- तिसरे....अंक - 50वा

दैनिक वात्रटिका
24जुलै2023....वर्ष- तिसरे....अंक - 50वा
अंक डाऊनलोड लिंक-
https://drive.google.com/file/d/1KH-YLGfojX15_8g14ra51-1Ul6PQT6EP/view?usp=drivesdk
 

Sunday, July 23, 2023

दैनिक वात्रटिका23जुलै2023....वर्ष- तिसरे....अंक - 49वा

दैनिक वात्रटिका
23जुलै2023....वर्ष- तिसरे....अंक - 49वा
अंक डाऊनलोड लिंक-

घटनांचा अन्वयार्थ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

घटनांचा अन्वयार्थ

घटनेला आणि दुर्घटनेलाही,
आपल्या दृष्टिकोनातून पाहिले जाते.
आपण भावनेत वाहत आहोत,
याचे भान तरी कुठे राहिले जाते?

भावनेच्या भरात मग,
सारासार विवेकही नष्ट होत जातो.
कुणी कितीही दडवला तरी,
इरादाही जास्तच स्पष्ट होत जातो.

कशाचा अर्थ कसा लावायचा?
हेही अगदी पक्के ठरलेले असते !
ते तेच उगवून येत जाते,
जे अगोदरच पेरलेले असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8309
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
23जुलै जून2023
 

भावी मुख्यमंत्रीपदाचा दावा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

भावी मुख्यमंत्रीपदाचा दावा

भावी मुख्यमंत्री नावाचे पिल्लू,
आजकाल जोरात उडते आहे.
भावी मुख्यमंत्रीपदाच्या यादीमध्ये,
रोज नव नवीन भर पडते आहे.

कुणाचा निष्ठादर्शनासाठी आटापिटा,
तर कुणाचा दबावासाठी रेटा आहे.
ज्यांनी बांधले गुडघ्याला बाशिंग,
त्यांच्या समर्थकांना कुठे तोटा आहे?

कुणाच्या पोटात वळवळ आहे,
कुणाच्या गोटात खळबळ आहे !
कुणाच्या जखमेची खपली निघून,
पुन्हा तिथेच नवी भळभळ आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6871
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
23जुलै2023
 

Saturday, July 22, 2023

दैनिक वात्रटिका22जुलै2023....वर्ष- तिसरे....अंक - 48वा

दैनिक वात्रटिका
22जुलै2023....वर्ष- तिसरे....अंक - 48वा

दिल्ली वाऱ्या....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

दिल्ली वाऱ्या

कशाला गेलो?कुणाला भेटलो?
हे सांगायच्याही चोऱ्या आहेत.
आजकाल उठता बसता,
अचानक दिल्लीच्या वाऱ्या आहेत.

सिंगल नाही, डबल नाही,
आता तर हे टिबल टिबल आहे !
दिल्ली आणि मुंबईला जोडणारी,
तीन पदरी केबल आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8308
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
22जुलै जून2023
 

सीमा हैदर इफेक्ट...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

सीमा हैदर इफेक्ट

प्रेमासाठी हैदरने सीमा ओलांडताच,
भारतात नवीनच विचार घोळू लागले.
पोरांनी सगळे खेळ दिले सोडून,
आता सगळेच पब्जी खेळू लागले.

पब्जीला आले पुन्हा चांगले दिवस,
काळया चिमण्यांनी तर,
सुटकेचा निःश्वास सोडला आहे !
एवढा सगळा चमत्कार,
सीमा हैदर प्रकरणाने घडला आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6869
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
22जुलै2023
 

Friday, July 21, 2023

दैनिक वात्रटिका 21जुलै2023....वर्ष- तिसरे....अंक - 47वा

दैनिक वात्रटिका
21जुलै2023....वर्ष- तिसरे....अंक - 47वा
अंक डाऊनलोड लिंक-

इमर्जन्सी अलर्ट मेसेज...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

इमर्जन्सी अलर्ट मेसेज

ह्याला आला;त्याला आला,
त्याला आणि तिलाही आला होता.
जसा प्रत्येकजण शहरला होता,
तसा त्याचा मोबाईल थरारला होता.

इमर्जन्सी अलर्ट मेसेज,
असा पहिल्यांदाच येतो आहे.
पण निसर्ग तर असे अलर्ट मेसेज,
अगदी सदा सर्वकाळ देतो आहे.

निसर्गाबरोबर सरकारही,
आपली काळजीच घेते आहे !
पण इमर्जन्सी आल्यानंतरही,
इशारे कोण समजून घेते आहे ?

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8308
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
21जुलै जून2023
 

निसर्गाची दरडावणी....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

निसर्गाची दरडावणी

निसर्गाचा तोल ढासळला की,
दरडीखाली गावे गुडुप होतात.
निसर्गाच्या एका कृतीपुढे,
गप्पेबाजही चिडीचूप होतात.

निसर्गावर अपकार करीत,
जेवढा माणूस निर्ढावतो आहे.
तेवढा निसर्ग माणसाला,
शिक्षा देत देत दरडावतो आहे.

जणू निसर्ग इच्छा नसतानाही,
एकाचा सूड दुसऱ्यावर घेतो आहे !
निसर्गशत्रूंच्या मूर्खपणामूळे,
निसर्गपूजकांचा बळी जातो आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6869
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
21जुलै2023
 

Thursday, July 20, 2023

दैनिक वात्रटिका20जुलै2023....वर्ष- तिसरे....अंक - 45 6वाअंक डाऊनलोड लिंक-

दैनिक वात्रटिका
20जुलै2023....वर्ष- तिसरे....अंक - 45 6वा
अंक डाऊनलोड लिंक-

फुसके बार...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

फुसके बार

काल ज्यांनी ज्यांनी एकमेकांवर,
एकमेकांवर आरोपाचे वार केले.
बघा आज नेमक तेच सारे,
एकमेकांचेच जिगरी यार झाले.

जसे वार फुसके निघाले आहेत,
तसे बार फुसके निघाले आहेत !
मजबूरी कुणाची माहित नाही,
सगळे फार फुसके निघाले आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8307
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
20जुलै जून2023
 

जाहिरातीचा जुगार....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------
जाहिरातीचा जुगार
याची मुळीच खंत नाही,
सचिन एखादी जाहिरात करतो आहे.
प्रश्न तेव्हा निर्माण होतो,
तो जेव्हा जुगाराची बात करतो आहे.
आपणही हेही समजू शकतो,
जाहिरातीशिवाय त्याचे निभत नाही.
पण भारतरत्न नावाच्या सचिनला,
हे कृत्य अजिबातच शोभत नाही.
फक्त जाहिरातीतल्या पैशासाठीच,
त्याचा सगळा आटापिटा आहे !
याचा अर्थ एवढाच निघू शकतो,
भारतरत्नापेक्षाही पैसा मोठा आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6867
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
20जुलै2023
-----------------------------------

Wednesday, July 19, 2023

दैनिक वात्रटिका19जुलै2023....वर्ष- तिसरे....अंक - 45वाअंक


दैनिक वात्रटिका
19जुलै2023....वर्ष- तिसरे....अंक - 45वा
अंक डाऊनलोड लिंक-

एनडीए विरुद्ध इंडिया...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

एनडीए विरुद्ध इंडिया

कुणाचा भांगडा,कुणाची लावणी,
कुणाकुणाचा डिस्को दांडिया आहे.
जुनेच सेनापती नवी लढाई,
आता एनडीए विरुद्ध इंडिया आहे.

अडोतीस विरुद्ध सव्वीस,
असे त्यांचे पक्षीय बलाबल आहे.
विरोधकांच्या एकजुटीला,
इंडिया असे नवे कोरे लेबल आहे.

नवे लेबल,जुने सेनापती,
घोडा मैदान आमने सामने आहेत!
अजून तरी कानावर मात्र,
जुनाच टोमणा,जुनेच टुमणे आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8306
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
19जुलै जून2023
 

आज चारित्र्याचे मोठे दंगे आहेत....

आजची वात्रटिका
-------------------------
*आज चारित्र्याचे मोठे दंगे आहेत*
काही न्हाणीघरात नंगे आहेत,
काही कपड्याच्या आत नंगे आहेत.
अशा सगळ्या नागव्यांकडूनच,
आज चारित्र्याचे मोठे दंगे आहेत.
कुणाचे हातोहात हात स्वच्छ,
कुणाचे हात अजूनही रंगे आहेत.
उजव्या आणि डाव्या हातांकडूनही,
आज चारित्र्याचे मोठे दंगे आहेत.
ठरवून त्यांना त्यांना नंगे करतात,
ज्यांचे ज्यांचे नंग्याशीच पंगे आहेत.
अशा सगळ्या नंग्या - पुंग्यांचेचच,
आज चारित्र्याचे मोठे दंगे आहेत.
बघा दिसते का मधाळ फूल कुठे?
हे शोधणारे सारेच भुंगे आहेत.
पाठीशी भुंगा लागलेल्याकडूनही,
आज चारित्र्याचे मोठे दंगे आहेत.
कुणा कुणाच्या वांग्याचे झाले भरीत,
कुणा कुणाचे वासलेले वांगे आहेत !
देठाला काटे टोचलेल्यांकडूनच,
आज चारित्र्याचे मोठे दंगे आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6866
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
19जुलै2023
-----------------------------

 

Tuesday, July 18, 2023

दैनिक वात्रटिका18जुलै2023....वर्ष- तिसरे....अंक - 44वाअंक


दैनिक वात्रटिका
18जुलै2023....वर्ष- तिसरे....अंक - 44वा
अंक डाऊनलोड लिंक-

सावळा गोंधळ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

सावळा गोंधळ

लोकशाहीच्या सभागृहापुढे,
आता नवीनच पेच आहेत.
जे पक्ष विरोधात आहेत,
सत्ताधारी पक्षही तेच आहेत.

लोकशाहीचेही शहाणपण,
हल्ली सत्तेपुढे चालत नाही.
आपलेच उदार धोरण,
हल्ली लोकशालाही पेलत नाही.

उदार लोकशाहीच्या हातावर,
कोहळा घेऊन आवळा आहे !
गाढवापुढे गीता वाचली तरी,
आजचा गोंधळ सावळा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8305
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
18जुलै जून2023
 

गटशाही जिंदाबाद...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

गटशाही जिंदाबाद

पक्षातल्या गटा-तटाचे,
बघा केवढे वट आहेत.
जसे सत्तेमध्ये पक्ष आहेत,
तसे सत्तेमध्ये गट आहेत.

लोकशाहीला फाटा देत,
गटशाही बोकाळते आहे.
लोकशाहीची गळचेपी बघून,
गटशाही चेकाळते आहे.

जसे आपलेच दात आहेत,
तसे आपलेच ओठ आहेत !!
गटशाहीकडून लोकशाहीच्या,
थेट गळ्याचेच घोट आहेत !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
चिमटा-6866
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
18जुलै2023
 

Monday, July 17, 2023

दैनिक वात्रटिका17जुलै2023....वर्ष- तिसरे....अंक - 43वाअंक डाऊनलोड लिंक-

दैनिक वात्रटिका
17जुलै2023....वर्ष- तिसरे....अंक - 43वा
अंक डाऊनलोड लिंक-

गटारी 2023....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

गटारी 2023

आधीच होती गटारी,
त्यात रविवारची सुट्टी होती.
नवऱ्यांची जात तर,
बायकांपेक्षाही हट्टी होती.

कुणाच्या हाती देशी-विदेशी,
कुणाच्या हाती हातभट्टी होती.
तमाम पिणाऱ्या खाणाऱ्यांशी,
प्रत्यक्ष काळाचीही गट्टी होती.

नवऱ्यांनी खेळली गटारी,
बायकांनी आषाढ तळला होता!
त्यांची नशा यांना चढली,
बायकांनी श्रावण माळला होता !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------
चिमटा-6865
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
17जुलै2023
 

घालीन लोटांगण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------
घालीन लोटांगण....
आधी तावा-तावात शक्ती प्रदर्शन झाले,
मग भावा-भावात भक्ती प्रदर्शन केले.
गावा-गावात हाकारे आणि पुकारे देत,
कार्यकर्त्यांवर चक्क सक्ती प्रदर्शन केले.
शक्ती भक्ती आणि सक्तीनंतर,
आता युक्तीच्या गोष्टीची अपेक्षा आहे.
ज्यांच्या वयाची आणि अनुभवाची,
अगदी छाती ठोकपणे उपेक्षा आहे.
भक्ती-शक्ती;सक्ती-युक्तीच्या गोष्टीमुळे,
शंका-कुशंकांना मोकळे पटांगण आहे !
बडवे हटाव..बडवे हटाव चा नारा देत,
भक्तांचे विठ्ठलासमोर लोटांगण आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8304
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
17जुलै जून2023

 

Sunday, July 16, 2023

दैनिक वात्रटिका 16जुलै2023....वर्ष- तिसरे....अंक - 42वा

दैनिक वात्रटिका
16जुलै2023....वर्ष- तिसरे....अंक - 42वा
अंक डाऊनलोड लिंक-
https://drive.google.com/file/d/1D4V3iOCxXYWIQHAhjydAySW604ek70d3/view?usp=drivesdk
 

आधुनिक लोकशाही....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

आधुनिक लोकशाही

ज्याला पाहिजे त्याला,
आज सत्तेचा वाटा आहे.
लोकशाहीच्या मार्गानेच,
लोकशाहीला फाटा आहे.

लोकशाहीकडे बघून,
आज त्यांचीच ख्या ख्या आहे.
त्यांना जशी पाहिजे तशी,
लोकशाहीची व्याख्या आहे.

आदर्श गोष्टी उण्या झाल्या,
जुन्या व्याख्या जुन्या झाल्या !
ज्या पायावर लोकशाही उभी,
त्याच गोष्टी सुन्या झाल्या !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
फेरफटका-8303
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
16जुलै जून2023
 

ऊंचे लोग ऊंची पसंद...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

ऊंचे लोग ऊंची पसंद

त्यांच्या अंधश्रद्धा तेवढ्या उच्च,
जेवढे उच्च त्यांचे शिक्षण आहे
हे तर अगदी सरळ सरळ,
त्यांचे हात दाखवून अवलक्षण आहे.

हे तर विचारायलाच नको,
त्यांच्या अंधश्रद्धा काय काय आहेत?
जेवढे हाय फाय लोक,
तेवढ्या अंधश्रद्धाही हायफाय आहेत.

उच्चभ्रू लोकांच्या अंधश्रद्धांना,
उच्चभ्रू अंधश्रद्धांच्या पॉलिश आहेत!
त्यांच्या बालबुद्धीची कीव करावी,
एवढे सगळे प्रकार बालिश आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
चिमटा-6864
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
16जुलै2023
 

Saturday, July 15, 2023

दैनिक वात्रटिका15जुलै2023....वर्ष- तिसरे....अंक - 41वा



दैनिक वात्रटिका
15जुलै2023....वर्ष- तिसरे....अंक - 41वा
अंक डाऊनलोड लिंक-
 

भूमिकांतराची सर्कस...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

भूमिकांतराची सर्कस

कालच्या आपल्याच भूमिकांनी,
आज तेच उघडे होऊ लागले.
आपल्याच बेगडेपणामुळे,
आज तेच नागडे होऊ लागले.

कालच्याच आपल्या भूमिकांची,
आज नव्या भूमिकेत मांडणी आहे.
जुन्याच त्या दळणाची,
आज नव्या जात्यात कांडणी आहे.

आपल्या कोलांटउड्या प्रतिपादताना,
आज त्यांचीच पुन्हा कसरत आहे !
सारी राजकीय सर्कस सांभाळताना,
त्यांचीच विश्वासार्हता घसरत आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------
चिमटा-6863
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
15जुलै2023
 

दैनिक वात्रटिका27एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -325वा

दैनिक वात्रटिका 27एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -325वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1NoornI--tmMB-ZAcXYuN3...