Wednesday, July 5, 2023

जिरला का कंड?....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
-------------------------

जिरला का कंड?

सत्तेचा घातकी खेळ बघून,
त्यांचा कट्टरपणा विरला असेल,
कट्टर कट्टर कार्यकर्त्यांचा,
चांगलाच कंड जिरला असेल.

कट्टर कार्यकर्त्यांच्या नेत्यांचे,
एकमेकांच्या गळ्यात गळे आहेत.
जे कार्यकर्ते अजूनही कट्टर,
ते जेवढे वेडे तेवढेच खुळे आहेत.

कार्यकर्त्यांनो उघडा डोळे बघा नीट,
आता तरी तुम्हाला याचा वीट यावा !
नेत्यांनी छू.. म्हटले की धावणारा,
गोंडबाज कार्यकर्ता नीट व्हावा !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------
फेरफटका-8295
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
5जुलै जून2023
 

No comments:

daily vatratika...3april2025