Sunday, July 23, 2023

भावी मुख्यमंत्रीपदाचा दावा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

भावी मुख्यमंत्रीपदाचा दावा

भावी मुख्यमंत्री नावाचे पिल्लू,
आजकाल जोरात उडते आहे.
भावी मुख्यमंत्रीपदाच्या यादीमध्ये,
रोज नव नवीन भर पडते आहे.

कुणाचा निष्ठादर्शनासाठी आटापिटा,
तर कुणाचा दबावासाठी रेटा आहे.
ज्यांनी बांधले गुडघ्याला बाशिंग,
त्यांच्या समर्थकांना कुठे तोटा आहे?

कुणाच्या पोटात वळवळ आहे,
कुणाच्या गोटात खळबळ आहे !
कुणाच्या जखमेची खपली निघून,
पुन्हा तिथेच नवी भळभळ आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6871
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
23जुलै2023
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...