आजची वात्रटिका
-------------------------
नवा विठ्ठल,नवे बडवे
प्रत्येकच बंडाच्या वेळी,
कुणीतरी कडवे ठरतात.
कुणीतरी ठरतो विठ्ठल,
कुणीतरी बडवे ठरतात.
बंड कुणाचेही असले तरी,
बंड हा विश्वासघात असतो.
एकाची होते बदनामी,
एकाचा कमरेवर हात असतो.
कोणता झेंडा घेवू हाती ?
हल्ली हा प्रश्नच पडत नाही !
आयोग असता पाठीशी,
बंडवाल्यांचेही अडत नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------
चिमटा-6854
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
6जुलै2023

No comments:
Post a Comment