Monday, July 3, 2023

भूत,वर्तमान आणि भविष्य...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
-------------------------
भूत,वर्तमान आणि भविष्य
महाराष्ट्राने 2019 नंतर,
बहुरंगी तमाशा पहिला आहे.
आता फक्त मनसे पक्षच,
सत्तेत यायचा राहिला आहे.
ज्याच्या त्याच्या बंडाला,
उठावाचे सोयीस्कर नाव आहे.
पडक्या सडक्या मालालाही,
आज पाहिजे तेवढा भाव आहे.
नको नको त्यांचा हातात हात,
नको नको त्यांचीच एकी आहे !
आता फक्त काँग्रेसनेच,
भाजपाला पाठिंबा देणे बाकी आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------
फेरफटका-8293
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे

3जुलै जून2023 

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...