Monday, July 17, 2023

गटारी 2023....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

गटारी 2023

आधीच होती गटारी,
त्यात रविवारची सुट्टी होती.
नवऱ्यांची जात तर,
बायकांपेक्षाही हट्टी होती.

कुणाच्या हाती देशी-विदेशी,
कुणाच्या हाती हातभट्टी होती.
तमाम पिणाऱ्या खाणाऱ्यांशी,
प्रत्यक्ष काळाचीही गट्टी होती.

नवऱ्यांनी खेळली गटारी,
बायकांनी आषाढ तळला होता!
त्यांची नशा यांना चढली,
बायकांनी श्रावण माळला होता !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------
चिमटा-6865
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
17जुलै2023
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 31मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 301वा l पाने -54

दैनिक वात्रटिका l 31मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 301वा l पाने -54 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1S4SAD0tMR_eqzmeUqaS...