Sunday, July 30, 2023

उपेक्षेचे दाखले....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

उपेक्षेचे दाखले

कुणाला झिजवले जाते,
कुणाला कुजवले जाते.
दगडालाही शेंदूर फासून,
कधी कधी उजवले जाते.

कुणाकडे असते धमक,
कुठे उत्साह रगड असतो.
दगडच उजवला जातो,
कारण तो दगड असतो.

खुजे उंच केले जातात,
उंच खुजे केले जातात !
लायकांना तळतळत ठेवून,
त्यांचे भजे केले जातात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8315
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
30जुलै जून2023
 

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...