Wednesday, July 12, 2023

पक्षफूट:एक संधी....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

पक्षफूट:एक संधी

कोणताही पक्ष फुटला तरी,
जशी निष्ठावंतात अंदाधुंदी असते.
तशी गद्दारांबरोबर निष्ठावंतांनाही,
अगदी एक नंबरची संधी असते.

नंबर गेमच सांगत राहतो,
नेते कसे आणि कोण होतात?
जसे दोन-दोन नंबर एक,
तसे दोन-दोन नंबर दोन होतात.

पक्ष फुटीच्या नकारात्मकतेमधून,
असेच सकारात्मकच शोधले जाते !
जो फक्त हळहळत बसतो,
त्याला नकारात्मकत्वच बाधले जाते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------
फेरफटका-8301
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
12जुलै जून2023
 

No comments:

फूट आणि विलीनीकरण...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- फूट आणि विलीनीकरण फुटीनंतर विलीनीकरण असते, विलीनीकरणानंतर फूट असते. तरीही दिल्लीपासून गल्लीपर्यंत,...