Wednesday, January 31, 2024

दैनिक वात्रटिका31जानेवारी2024....वर्ष- तिसरे..अंक -238वा

दैनिक वात्रटिका
31जानेवारी2024....वर्ष- तिसरे..
अंक -238वा 
अंक डाऊनलोड लिंक -

भ्रमाचा भोपळा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

भ्रमाचा भोपळा

दिसूनसुद्धा आंधळे बनले की,
लपाछपी खेळायला मजा येते.
कळूनही न कळल्यासारखे केले की,
कुणालाही छळायला मजा येते.

पुढच्याला चितपट केले तरी,
त्याला मग जिंकल्याचा भास होतो.
पाठीराख्यांनी जल्लोष केला की,
सगळाच कार्यक्रम खास होतो.

डोक्यातली हवा निघून गेली की,
वास्तवाची जाणीव होऊ लागते !
आभाळाला घातलेली गवसणीही,
ज्याची त्याची उणीव होऊ लागते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8466
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
31जानेवारी 2024
 

Tuesday, January 30, 2024

दैनिक वात्रटिका30जानेवारी2024....वर्ष- तिसरे..अंक -237वा


दैनिक वात्रटिका
30जानेवारी2024....वर्ष- तिसरे..
अंक -237वा 
अंक डाऊनलोड लिंक -
 

गांधी और आँधी....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

गांधी और आँधी

महात्मा गांधींच्या पुण्यतिथीला,
नथुराम पुन्हा पुन्हा जिवंत होतो.
नथुराम कुणासाठी आयडॉल,
तर कुणासाठी तो चक्क संत होतो.

माफीचे साक्षीदारसुद्धा,
नथुरामला निर्दोष ठरवू लागतात.
दरवर्षी नव्या वादाची फोडणी देत,
नवा माल - मसाला पुरवू लागतात.

गांधी आँधी असल्यामुळेच,
असला पालापाचोळा उडू शकतो !
देशद्रोह्याला देशभक्त ठरविण्याचा,
अपराध पुन्हा पुन्हा घडू शकतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8465
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
30जानेवारी 2024
 

Monday, January 29, 2024

दैनिक वात्रटिका29जानेवारी2024....वर्ष- तिसरे..अंक -236वा

दैनिक वात्रटिका
29जानेवारी2024....वर्ष- तिसरे..
अंक -236वा 
अंक डाऊनलोड लिंक -

 

बिहारनामा ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

बिहारनामा

नितीशकुमार झाले मुख्यमंत्री,
ना कसली गद्दारी; ना कसले बंड.
बिहार म्हणाला लोकशाहीला,
एकदाचा जिरला का तुझा कंड ?

कोण कोणत्या पक्षाचे मुख्यमंत्री?
हे मात्र कुणी मोजू -बिजू नका.
त्यांनाच त्याची काही वाटत नाही,
तुम्हीसुद्धा काही लाजू बिजू नका.

दोन फुल;एक हाफ,
परंपरा दृढ केली जाते आहे !
आपली भारतीय लोकशाही,
उत्तरोत्तर खूप प्रगल्भ होते आहे !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8464
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
29जानेवारी 2024
 

Sunday, January 28, 2024

दैनिक वात्रटिका28जानेवारी2024....वर्ष- तिसरे..अंक -235वा


दैनिक वात्रटिका
28जानेवारी2024....वर्ष- तिसरे..
अंक -235वा 
अंक डाऊनलोड लिंक -
 

अंतर्गत पक्षांतर...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

अंतर्गत पक्षांतर

आपल्याबरोबर त्यांचीही
अक्कल पेंड खाते आहे.
महाआघाडआणि महायुतीत,
अंतर्गत पक्षांतर होते आहे.

महाआघाडी आणि महायुती,
आपल्या नखांनी टोकरली आहे.
वरून मजबूत असली तरी,
आतून मात्र पोखरली आहे.

आयात आणि निर्यातीचे,
असे कडवट घोट आहेत !
आपल्याच दाताखाली,
आपलेच तर ओठ आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8463
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
28जानेवारी 2024
 

Friday, January 26, 2024

दैनिक वात्रटिका26जानेवारी2024....वर्ष- तिसरे..अंक -233वा


दैनिक वात्रटिका
26जानेवारी2024....वर्ष- तिसरे..
अंक -233वा 
अंक डाऊनलोड लिंक -
 

औचित्य भंग...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

औचित्य भंग

तिरंगी झेंड्याच्या साक्षीने,
औचित्याला शह दिला जातो.
26 जानेवारी असला तरी,
त्याचा 15 ऑगस्ट केला जातो.

आम्ही भारताचे लोक,
हा गोंधळ सोडणार कधी?
आपल्या रोजच्या जगण्याला,
संविधानाशी जोडणार कधी?

स्वातंत्र्याला संयमाची जोड,
आपला गणतंत्र देऊ शकतो !
नसता आपल्याच देशात,
आपण परतंत्र होऊ शकतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8462
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
26जानेवारी 2024
 

Thursday, January 25, 2024

दैनिक वात्रटिका25जानेवारी2024....वर्ष- तिसरे..अंक -232वा


दैनिक वात्रटिका
25जानेवारी2024....वर्ष- तिसरे..
अंक -232वा 
अंक डाऊनलोड लिंक -
 

गेम प्लॅन...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

गेम प्लॅन

एकदा जल्लोष खपला की,
मग उन्मादाला प्रारंभ होतो.
दिखाऊ सोज्वळपणाचाही,
फिरून पुन्हा एकदा दंभ होतो.

आतला दंभ जागा झाला की,
मग दांभिकतेचा कळस होतो.
या सगळ्या बनवाबनवीचा,
मग नको तेवढा किळस येतो.

तरीही सगळ्या दांभिकतेला,
लोक सारे सरावलेले असतात !
खऱ्या खोट्याच्या दर्शनापासून,
लोक सारे दुरावलेले असतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8461
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
25जानेवारी 2024
 

Wednesday, January 24, 2024

दैनिक वात्रटिका24जानेवारी2024....वर्ष- तिसरे..अंक -231वा


दैनिक वात्रटिका
24जानेवारी2024....वर्ष- तिसरे..
अंक -231वा 
अंक डाऊनलोड लिंक -
 

रामायण लाईव्ह...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

रामायण लाईव्ह

कुणी फ्रंट फुटवर आला की,
कुणाचा सरळ बॅक ड्राईव्ह आहे.
जिकडे बघावे तिकडे,
आजकाल 'रामायण लाईव्ह' आहे.

कुठे राम आहे;कुठे रावण आहे,
सगळीकडे माकडांची फौज आहे.
त्यांनी लक्ष्मण रेषा ओलांडली की,
आपल्यासाठी मौजच मौज आहे.

आपल्या मते रामायण लाईव्ह,
त्यांच्या मते हे राम राज्य आहे !
प्रत्यक्ष वाल्मिकीसुद्धा हत बुद्ध,
आजकाल वालीही पूज्य आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8460
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
24जानेवारी 2024
 

सर्वेक्षक...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


 

Tuesday, January 23, 2024

दैनिक वात्रटिका23जानेवारी2024....वर्ष- तिसरे..अंक -230वा


दैनिक वात्रटिका
23जानेवारी2024....वर्ष- तिसरे..
अंक -230वा 
अंक डाऊनलोड लिंक -
 

सोहळ्याचा पंचनामा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

सोहळ्याचा पंचनामा

सोहळा कुठलाही असो,
त्यात हौशे आणि नवशे असतात.
एवढेच नाही तर,
सोहळ्यामध्ये गवशे असतात.

हौशे,नवशे आणि गवशेही
सगळेच सोहळा एन्जॉय करतात.
फक्त एवढे विचारू नका,
नेमके कोण काय काय करतात?

हौश्या,नवश्या आणि गवश्यानेही,
आपला मतलब साधलेला असतो !
जे फक्त बघे असतात,
त्यांना सोहळा बाधलेला असतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8459
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
23जानेवारी 2024
 

Monday, January 22, 2024

दैनिक वात्रटिका22जानेवारी2024....वर्ष- तिसरे..अंक -229 वा

दैनिक वात्रटिका
22जानेवारी2024....वर्ष- तिसरे..
अंक -229 वा 
अंक डाऊनलोड लिंक -

महा-काव्य-शक्ती...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

महा -काव्य-शक्ती

काव्यात एवढी महाशक्ती आहे की,
जी वाल्याचाही वाल्मिकी करू शकते.
काव्यप्रतिमेपुढे प्रत्यक्ष वास्तवताही,
अगदीच फिकी फिकी ठरू शकते.

काव्यशक्ती जशी वास्तवाला कल्पना,
तशी कल्पनेलाही वास्तव ठरवू शकते.
महाकाव्य नावाच्या साहित्याला,
जनता डोक्यावर घेऊन मिरवून शकते.

महाकाव्यशक्तीच्या व्यासामध्ये,
विश्वलाही सामावण्याची शक्ती आहे !
हे साहित्यिकांनो पुन्हा सिद्ध करू,
आपल्या शब्दातही शक्ती-भक्ती आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8458
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
22जानेवारी 2024
 

Sunday, January 21, 2024

दैनिक वात्रटिका21जानेवारी2024....वर्ष- तिसरे..अंक -228 वा


दैनिक वात्रटिका
21जानेवारी2024....वर्ष- तिसरे..
अंक -228 वा 
अंक डाऊनलोड लिंक -
 

हिट फॉर्म्युला..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

हिट फॉर्म्युला

माणसासारखा माणूस झेपत नाही,
असे जेव्हा कळून चुकले जाते.
तेव्हा माणसासारख्या माणसालाच,
चक्क देव बनवून टाकले जाते.

माणसाचा देव बनवून भागत नाही,
अवताराचा मुलामा चढवला जातो.
मग ज्या त्या देवाविरुद्ध,
त्याचा त्याचा भक्तच लढवला जातो.

इतिहासाच्या पाना -पानावरती,
हाच फॉर्मुला हिट ठरला आहे !
विरोधकांना पाणी पाजणारा,
भक्तांविरुद्ध लढताना हरला आहे !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8457
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
21जानेवारी 2024
 

Saturday, January 20, 2024

दैनिक वात्रटिका20जानेवारी2024....वर्ष- तिसरे..अंक -227 वा

दैनिक वात्रटिका
20जानेवारी2024....वर्ष- तिसरे..
अंक -227 वा 
अंक डाऊनलोड लिंक -

खादडांचे घोटाळे...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
-------------------------

खादडांचे घोटाळे

खा खा खाल्ले तरी,
अजून कुणाचेच पोट भरले नाही.
त्यांनी खायचे राहिले आहे,
असे अजून तरी काही उरले नाही.

खादाडांसाठी सत्ता म्हणजे,
कल्पवृक्ष आणि कामधेनू आहे.
म्हणूनच तर द्रौपदीच्या थाळीत,
दरवेळी नवा नवा मेनू आहे.

कालपर्यंत एकत्र खाल्लेले,
एकमेकांचे घास मोजू लागातात !
कुठल्याही घोटाळ्यांची प्रकरणं,
तेव्हाच तर गाजू लागतात!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8456
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
20जानेवारी 2024

Friday, January 19, 2024

दैनिक वात्रटिका19जानेवारी2024....वर्ष- तिसरे..अंक -226 वा

दैनिक वात्रटिका
19जानेवारी2024....वर्ष- तिसरे..
अंक -226 वा 
अंक डाऊनलोड लिंक -

 

मार्केटिंग थिअरी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

मार्केटिंग थिअरी

एकदा गिर्‍हाईक तयार केले की,
वाट्टेल त्याचा खप होऊ लागतो.
गिऱ्हाईकांची गरज निर्माण केली की,
वाट्टेल त्याचा जप होऊ लागतो.

आपल्या मूळ उद्दिष्टांची,
सगळी कशी लपवालपी सुरू होते.
जे पाहिजे;जसे पाहिजे त्याची,
सगळी कशी खपवाखपवी सुरू होते.

ढिले असलेले बाजाराचे नियम,
हळूहळू मग सक्त होऊन जातात !
एकदा गरज व्यसन झाले की,
गिर्‍हाईकांचेही भक्त होऊन जातात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8455
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
19जानेवारी 2024
 

Thursday, January 18, 2024

दैनिक वात्रटिका18जानेवारी2024....वर्ष- तिसरे..अंक -225 वा


 दैनिक वात्रटिका
18जानेवारी2024....वर्ष- तिसरे..
अंक -225 वा 
अंक डाऊनलोड लिंक -

भ्रष्टाचाराचे नामांतर...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

भ्रष्टाचाराचे नामांतर

मिठाईच्या पेट्या झाल्या,
पेट्यांचेही मग खोके झाले.
देणाऱ्यांचे आणि घेणाऱ्यांचे,
सगळेच मग ओके झाले.

भ्रष्टाचाराच्या पैशाची,
सतत बदलती रूपे आहेत.
इमानदारीच्या पेकाटात,
उठता बसता लाफे आहेत.

खाण्यात आणि खिलविण्यात,
तसे खूपच धोके आहेत !
उद्याचे काही माहीत नाही,
सध्या खोक्यावर खोके आहेत !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8454
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
18जानेवारी 2024
 

Wednesday, January 17, 2024

दैनिक वात्रटिका17जानेवारी2024....वर्ष- तिसरे..अंक -224 वा


दैनिक वात्रटिका
17जानेवारी2024....वर्ष- तिसरे..
अंक -224 वा 
अंक डाऊनलोड लिंक -
 

लोक भ्रम...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

लोक भ्रम

लोकांना बहिकावण्याच्या,
खेळ्या अजून टळल्या नाहीत
लोकांना अजून आपल्या,
खऱ्या गरजा कळल्या नाहीत.

लोकांच्या खऱ्या गरजा,
लोकांना कळू दिल्या जात नाहीत.
लोकांच्या श्रद्धा आणि अंधश्रद्धा,
थोड्याही ढळू दिल्या जात नाहीत.

या सोडून पुढच्या जन्माची,
लोकांना आशा दाखवली जाते !
पुढच्या जन्माच्या तरतुदीची,
या जन्मी किंमत चुकवली जाते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8453
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
17जानेवारी 2024
 

Tuesday, January 16, 2024

दैनिक वात्रटिका16जानेवारी2024....वर्ष- तिसरे..अंक -223 वा


दैनिक वात्रटिका
16जानेवारी2024....वर्ष- तिसरे..
अंक -223 वा 
अंक डाऊनलोड लिंक -

राजकीय असुरक्षितता...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

राजकीय असुरक्षितता

फुटाफुटीचे कारण विचारले तर,
प्रत्येकाच्या नाकाला मिरची आहे.
फटाफुट एवढी जोरात आहे की,
जसे काय ती तर संगीत खुर्ची आहे.

ज्याच्या त्याच्या मनामध्ये,
आपल्या असुरक्षिततेचा भाव आहे.
आपल्या आपल्या गद्दारीला,
आपल्या आपल्या सोयीचे नाव आहे.

सर्वच राजकीय पक्षांमध्ये,
आज असुरक्षिततेची लागण आहे !
खुर्ची सलामत तो पक्ष पचास,
आजचा लोकप्रिय स्लोगन आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8452
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
16जानेवारी 2024
 

Monday, January 15, 2024

दैनिक वात्रटिका15जानेवारी2024....वर्ष- तिसरे..अंक -222 वा


दैनिक वात्रटिका
15जानेवारी2024....वर्ष- तिसरे..
अंक -222 वा 
अंक डाऊनलोड लिंक -
 

बेकी दर्शन....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

बेकी दर्शन

एकी दाखवायच्या प्रयत्नात,
हमखास बेकी दिसली जाते.
तोंडदेखलेपणा करता करता,
त्यांची दातखिळी बसली जाते.

महाआघाडी असो वा महायुती,
सगळ्यांनाच ही भीती असते.
तरीही सगळ्यांकडूनच,
पुन्हा पुन्हा तीच कृती असते.

जशी एकी दाखवली जाते,
तशी बेकीही दाखवली जाते !
आतल्या गोटामधूनच तर,
बेकीची चर्चा पिकवली जाते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8451
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
15जानेवारी 2024
 

Sunday, January 14, 2024

दैनिक वात्रटिका14जानेवारी2024....वर्ष- तिसरे..अंक -221 वा

दैनिक वात्रटिका
14जानेवारी2024....वर्ष- तिसरे..
अंक -221 वा 
अंक डाऊनलोड लिंक -

घराणेशाहीचा दंश...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

 

आजची वात्रटिका
-------------------------

घराणेशाहीचा दंश
कधी इकडूनकधी तिकडून,
घराणेशाहीवर विधान येते
घराणेशाहीच्या चर्चेला मग,
पुन्हा पुन्हा उधाण येते.
कशालाही उधाण आले की,
नंतर हमखास ओहोटी येते.
तेरी भी चुप;मेरी भी चुप,
समेटाची भाषा ओठी येते.
लोकशाही आणि घराणेशाही,
दोघांचाही एकच वंश आहे !
फक्त तुमच्या आमच्या समोर,
एकमेकांना जहरी दंश आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8450
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
14जानेवारी 2024

Saturday, January 13, 2024

दैनिक वात्रटिका13जानेवारी2024....वर्ष- तिसरे..अंक -220 वा


दैनिक वात्रटिका
13जानेवारी2024....वर्ष- तिसरे..
अंक -220 वा 
अंक डाऊनलोड लिंक -
 

तिचे दिनविशेष ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

तिचे दिनविशेष

तीन आणि बारा जानेवारीला,
लागूनच संक्रांत येत असते.
आपण येडे की खुळे आहोत?
ती दरवर्षी चिंताक्रांत होत असते.

तीन जानेवारी,बारा जानेवारी,
काळ तिची परीक्षा घेत राहतो.
तिच्या दुटप्पी वागण्याला,
आठ मार्च धक्का देत राहतो.

आपण सबला की आबला?
डोक्यात तबला वाजत राहतो !
पुढे जाता जाता मागे जाणे,
हा उलटा प्रवास गाजत राहतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8449
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
13जानेवारी 2024
 

Friday, January 12, 2024

दैनिक वात्रटिका12जानेवारी2024....वर्ष- तिसरे..अंक -219 वा


दैनिक वात्रटिका
12जानेवारी2024....वर्ष- तिसरे..
अंक -219 वा 
अंक डाऊनलोड लिंक -
 

डबल रोल...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

डबल रोल

जे लोकशाहीला जिंकवू शकतात,
तेच लोकशाहीला हरवू शकतात.
जिंदाबाद...मुर्दाबाद करीत,
तेच लोकशाहीला मिरवू शकतात.

कधी त्यांचा लोकशाहीच्या बाजूने,
कधी तिच्याच विरोधात पक्ष असतो.
स्वार्थी राजकारणापायीच,
मग लोकशाहीचा सोक्षमोक्ष असतो.

कधी म्हणतात,लोकशाही जिवंत आहे
कधी म्हणतात,लोकशाही मेली आहे !
त्यांच्या वर्तनाचे अर्थ लावता लावता,
तुमची आमची पंचायत झाली आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8448
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
12जानेवारी 2024
 

Thursday, January 11, 2024

दैनिक वात्रटिका12जानेवारी2024....वर्ष- तिसरे..अंक -218 वा

दैनिक वात्रटिका
12जानेवारी2024....वर्ष- तिसरे..
अंक -218 वा 
अंक डाऊनलोड लिंक -

 

न्याय आणि अन्याय...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

न्याय आणि अन्याय

खरे असो वा खोटे सो,
न्यायदेवता पुरावे मागत असते.
खोट्यापेक्षा खऱ्याचीच परीक्षा,
इथे न्यायदेवता बघत असते.

खोटे नाटे पुरावे देऊन,
खोटे आपलेच खरे करून घेते.
सत्याला मरण नाही म्हणत,
खरे आपला हट्ट पुरे करून घेते.

खोट्याची चीड यायची तर,
खऱ्याचीच कीव येऊ लागते !
सत्याच्या पाठीराख्यांचाही मग,
अंगामध्ये हिव येऊ लागते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8447
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
11जानेवारी 2024
 

Wednesday, January 10, 2024

दैनिक वात्रटिका10जानेवारी2024....वर्ष- तिसरे..अंक -217 वा

दैनिक वात्रटिका
10जानेवारी2024....वर्ष- तिसरे..
अंक -217 वा 
अंक डाऊनलोड लिंक -

धार्मिक गोची...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

धार्मिक गोची

धर्माचे उपयोग कमी होवून,
दुरुपयोगच जास्त होत आहेत.
लोकांना धर्मांध बनवून,
धार्मिकतेचा फायदा घेत आहेत.

त्यामुळेच कधी वाटू लागते,
धर्म म्हणजे तर एक टोळी आहे,
कार्ल मार्क्सचे पटू लागते,
धर्म म्हणजे अफूची गोळी आहे.

लोकांना कळतं पण वळत नाही,
इथेच धर्माची खरी गोची आहे !
धर्म असा काही नाचवला जातो,
जणू धर्म कोठ्यावरची नाची आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8446
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
10जानेवारी 2024
 

Tuesday, January 9, 2024

दैनिक वात्रटिका9जानेवारी2024....वर्ष- तिसरे..अंक -216वा


दैनिक वात्रटिका
9जानेवारी2024....वर्ष- तिसरे..
अंक -216वा 
अंक डाऊनलोड लिंक -
 

उलटा न्याय...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

उलटा न्याय

पात्र लोक अपात्र होतात,
अपात्र लोक पात्र होतात.
सगळी बनवाबनवी बघून,
थंड आपली गात्र होतात.

तेच आरोपी;तेच फिर्यादी,
निकालही तेच देऊ लागतात.
कायद्याच्या पळवाटांचा,
फायदाही तेच घेऊ लागतात.

ज्याची तोंड बघू नये वाटते,
त्यालाच हाय म्हणावे लागते !
तेच जे काही करतील,
त्यालाच न्याय म्हणावे लागते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8445
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
9जानेवारी 2024
 

Monday, January 8, 2024

दैनिक वात्रटिका8जानेवारी2024....वर्ष- तिसरे..अंक -215वा

 


दैनिक वात्रटिका
8जानेवारी2024....वर्ष- तिसरे..
अंक -215वा 
अंक डाऊनलोड लिंक -

नाटकांचा तमाशा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

नाटकांचा तमाशा

आधी महाराष्ट्राच्या राजकारणात,
म्हणे कट्यार पाठीत घुसली होती.
नंतर म्हणे,आता होती कुठे गेली ?
असा प्रयोग करीत बसली होती.

महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर,
नव्या नव्या नाटकांची नांदी आहे.
सारेच सज्जन असले तरी,
तो मी नव्हेच म्हणायची संधी आहे.

विच्छा माझी पुरी करा म्हणीत,
संशयकल्लोळाला जागा ठेवली आहे !
कुणाला बेईमान वाटू लागली,
ती तर हिमालयाची सावली आहे !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8444
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
8जानेवारी 2024
 

Sunday, January 7, 2024

सावित्री नावाची वाघीण,शेळी कधीच झाली नाही !



दगडालाही भ्याली नाही,शिव्या शापालाही भ्याली नाही !
सावित्री नावाची वाघीण,शेळी कधीच झाली नाही !!
सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त रंगले कवी संमेलन

पाटोदा-येथील नवगण शिक्षण संस्था संचालित वसंतदादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ३ जानेवारी २०२४ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयाच्या बागेत आयोजित खुल्या काव्यसंमेलनात प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांनी सावित्रीचा वसा या मालिका वात्रटिकेने अगदी सहज सुलभ आणि तितक्याच परखड शब्दांनी क्रांतीज्योती, कवित्री सावित्रीबाई फुले यांचे जीवन चरित्र उलगडून दाखवले. 
आपल्या 'सावित्रीचा वसा' या मालिका वात्रटिकेमध्ये मध्ये सूर्यकांत डोळसे यांनी सावित्रीबाई फुले यांचा  जीवन पट उघडून दाखवतानाच 

दगडाला भ्याली नाही,
शिव्या-शापालाही भ्याली नाही.
सावित्री नावाची वाघिण
शेळी कधीच झाली नाही.

तुम्ही आम्ही शेळपट
सावित्री मात्र वाघिण होती,
कारण ज्योतीबाच तसा आहे.
पुन्हा एकदा समजून घ्या
हा ’सत्यधर्म’कसा आहे?..

अशा  शब्दात ज्योतिबा आणि सावित्रीचा सत्य धर्मही समजावून सांगितला. सावित्री आणि ज्योतिबांची जोडी ही एक आदर्श समाज सुधारकांची जोडी होती. त्यांनी एकमेकांच्या साथीने समाजातील तळागाळातील लोकांसाठी शिक्षण खुले केले. एकत्रपणे खूप मोठा लढा दिला. त्यांचा जोडा हा आदर्श जोडा होत हे सांगताना...

सावित्रीलाही नटता आले असते,
सावित्रीलाही मुरडता आले असते.
अव्यवहारी नवरा म्हणून
ज्योतीबाला खरडता आले असते.

लष्कराच्या भाकर्‍या कशाला भाजता?
असे ओरडता आले असते.
पण सावित्रीचा धर्म
सांगा कुठे तसा आहे?
पुन्हा एकदा समजून घ्या
हा ’सत्यधर्म’कसा आहे?..

सगळ्या कुलूपबंद व्यवस्थेची
शिक्षण हीच चावी होती.
ज्योतीबांना सावित्री मिळाली,
त्यांना जशी हवी होती.

सावित्रीबाई फुले जेवढ्या मोठ्या क्रांतिकारी समाज सुधारक आहेत तेवढेच ते मोठ्या त्या कवित्री आहेत, त्यांचे योगदान मराठी काव्यात खूप महत्त्वाचे आहे.
सावित्रीबाईंच्या कवितांचा नव्याने विचार केला पाहिजे.
त्यांनी सहज शब्दात लिहिलेल्या कविता आजही नव्या पिढीला प्रेरणा देणाऱ्या आहेत.. अत्यंत ऊर्जादायी आहेत हे सांगताना डोळसे पुढे म्हणाले,

सावित्री उर्जेची जन्मदात्री होती,
सावित्री कवयित्री होती.
आपला जोडा आहे का?
सावित्री-ज्योतीबाचा जसा आहे?
पुन्हा एकदा समजून घ्या
हा ’सत्यधर्म’कसा आहे?...

सावित्री ज्योतीबांच्या सत्यधर्माची
जित्ता-जागता आरसा होती.
सावित्री ज्योतींच्या सत्यधर्माचा
जित्ता-जागता वारसा होती.

सावित्रीने दिलेली ललकार
आपल्याला देता येईल?
कारण सावित्रीचा तो कंठ,
आपला तो घसा आहे.
पुन्हा एकदा समजून घ्या
हा ’सत्यधर्म’कसा आहे?..
असाही आग्रह आपल्या मालिका मात्र वात्रटिकेतून धरला
कोणतीही कला अथवा काव्य कुणाचे तरी अनुकरण व अनुसरण केल्याशिवाय निर्माण होत नसते. कोणतीही व्यक्ती कुणाच्यातरी अनुकरणातून शिकत असते, अनुकरण करता करता त्यावरती चिंतन मनन केले स्वतःच्या विचार मंथनाचे संस्कार त्यावर करीत अनुसरणची पायरी गाठली अनुसरण म्हणजे अनुकरण करता करता त्यात घातलेली स्वतःची शैली होय.जगात स्वयंभू कोणीही नाही प्रत्येक कलाकार किंवा कवी कवीवाट कोणाचा तरी प्रभाव असतो. कधी कधी आपण तो प्रभाव मान्य करण्याचे टाळतो किंवा आपल्याला ते कमीपणाचे वाटते. मात्र हे चुकीचे आहे असेही प्रतिपादन सूर्यकांत डोळसे यांनी केले. 
याचवेळी त्यांनी आपल्या अनेक वात्रटिका सादर केल्या. वाढत्या स्त्री भृण हत्येवरती भाष्य करताना
सखे,सावित्री... या वात्रटिकेमधून

आम्ही सावि्त्रीच्या लेकी,
पूजा वडाची करीतो.
गर्भातल्या लेकी आम्ही
गर्भातच मारीतो.

सखे,सावित्री...सांग,
तुझा असा कसा बाई वसा ?
आमच्या रक्तातला अंधार
सांग जात नाही कसा?

अशा शब्दात कोरडे ओढले.
प्रमुख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रोफेसर आबासाहेब हांगे होते. विशेष अतिथी म्हणून वर्षा एकबोटे निमंत्रित होत्या. व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. गणेश पाचकोरे, आयक्यूएसी समन्वयक डॉ. मनोजकुमार प्रकाश, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. नामदेव चांगण, पर्यवेक्षक प्रा. अनिल जोगदंड, ग्रंथपाल प्रा. नंदकुमार पटाईत, प्रा.
जयंत साठे उपस्थित होते.
कार्यक्रमात सर्वप्रथम सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पमाल्यार्पण अध्यक्ष व अतिथींच्या हस्ते संपन्न झाले. 
यानंतर आयोजित काव्यसंमेलनाला मार्गदर्शन करताना सूर्यकांत डोळसे  म्हणाले की, युवकांनी काव्यनिर्मिती करताना जसे व्यक्त होता येईल तसे व्यक्त झाले पाहिजे. आपला हुंकार शब्दांमधून व्यक्त केला आपला आतला आवाज कवितेतून शब्दबद्ध करत असताना वृत्त किंवा अलंकार यांच्या बंधने झुगारून व्यक्त झाले पाहिजे. कुसुमाग्रज, मंगेश पाडगावकर, साने गुरुजी यांनी उदात्त प्रेमावरती आणि देशप्रेमावरती केलेल्या कवितांचे दाखले देत
कॉलेज जीवन म्हणजे युवा अवस्था...प्रेम युवावस्थेतच होत असते. प्रेम खरे तर देशावर असते, आईवर असते, प्रेम महान व्यक्तींवर असू शकते किंवा निसर्गावर पण प्रेम हे केले पाहिजे कारण प्रेम ही अशी भाषा आहे की ती जनावरांना सुद्धा समजते म्हणून प्रेमभावना व्यक्त झाल्याचं पाहिजेत. याप्रसंगी त्यांनी 'चेंडूचं फूल' मधून 
'तू लाँग ऑफला 
मी लाँग ऑनला,
डोळ्यातलं पाणी आवरत 
तो तिला म्हणाला, 

नशिबात आलं असं समजून 
आता आपापलं क्षेत्र राखीत जा, 
कधी मनात आलंच तर 
एखादा ओव्हरथ्रो 
माझासाठीही फेकीत जा'.

या ओळी सादर गेल्या आणि विद्यार्थ्यांच्या प्रचंड टाळ्या आणि प्रतिसाद मिळविला. याच वेळी त्यांनी आपल्या मालिका वात्रटिके मधून 

स्वत:चा वेडेपणा बघून
स्वत:वरच चिडला आहात.
स्वप्नांचे पंख लावून
पिसासारखे उडला आहात,
मग सरळ मान्य करा की,
प्रेमामध्ये पडला आहात...

कुणाशी तरी बोलून बोलून
मन हलकं हलकं होत आहे.
कंटाळा आला तरी
मन बोलकं बोलकं होत आहे.

जागेपणी स्वप्न पाहून
स्वप्नामध्येच पडला आहात.
दडविण्यासारखे काहीच नसतानाही
संकोचाने दडला आहात.
मग सरळ मान्य करा
प्रेमामध्ये पडला आहात...

कुणाच्या तरी चाहूलीने
काळीज धडधडत आहे.
राहून राहून कानमध्ये
कुणीतरी बडबडत आहे.

स्वत:तच स्वत:ला डिस्टर्ब करून
स्वत:वरतीच चिडला आहात.
मग सरळ मान्य करा की,
प्रेमामध्ये पडला आहात...

तुमच्या अंगाखांद्यावरती
मोरपिसं फिरत आहेत.
तुमच्या तना-मना‘ध्ये
फुलपाखरं शिरत आहेत.

इंद्रधनुचा गोफ करून
आकाशाशी भिडला आहात.
एक एक तारा तुम्ही
अलगदपणे खुडला आहात.
मग सरळ मान्य करा की,
प्रेमामध्ये पडला आहात..
मग सरळ मान्य करा प्रेमामध्ये पडला आहात' 
अशा हळुवार आणि नाजूक शब्द कळेना श्रोत्यांची दाद मिळवली. त्यांनी सादर केलेला ओव्हर थ्रो
तर प्रचंड हश्या आणि टाळ्या घेऊन गेला.

त्याला आवडायचा फुटबॉल,
तिला आवडायचा क्रिकेट,
कधी व्हायचा गोल,
कधी पडायची विकेट.

तेव्हा त्यांच्या लक्षात आले,
संसार म्हणजे खेळ नसतो !
आवडीनिवडी वेगळ्या असल्या तरी,
दोन जीवांचा मेळ असतो !!

यानंतर प्रमुख अतिथी वर्ष एकबोटे यांनीही आपल्या काही कविता सादर करीत आपल्या आयुष्यातील कवितेचे महत्त्व स्पष्ट केले आणि विद्यार्थी कवींना शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य प्रोफेसर हांगे म्हणाले की इतरांच्या प्रती केलेली कोणतीही चांगली वर्तणूक म्हणजे प्रेम असते. म्हणून सर्वावर प्रेम करत राहिले पाहिजे व युवकांनी काव्याच्या विश्वात नेहमी रमले पाहिजे. महाविद्यालयाच्या मराठी विभाग व महिला सक्षमीकरण समितीच्या वतीने आयोजित या काव्यसंमेलनात प्रा. प्रदीप मांजरे, डॉ. कुशाबा साळुंके, श्रीमती माधुरी पुराणिक, डॉ. प्रज्ञा बागूल, प्रा. जगन्नाथ पटाईत यांच्यासह विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपल्या अप्रतीम कविता सादर केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भारती नंदागौळी-फुलेकर व प्रा. कावेरी खुरणे यांनी केले. आभार डॉ. प्रज्ञा बागूल यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मराठी विभागप्रमुख  प्रोफेसर हमराज उईके, डॉ. दिलीप गिन्हे यांनी विशेष परिश्रम घेतले.

DAILY VATRATIKA...27APRIL2024