Sunday, January 14, 2024

घराणेशाहीचा दंश...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

 

आजची वात्रटिका
-------------------------

घराणेशाहीचा दंश
कधी इकडूनकधी तिकडून,
घराणेशाहीवर विधान येते
घराणेशाहीच्या चर्चेला मग,
पुन्हा पुन्हा उधाण येते.
कशालाही उधाण आले की,
नंतर हमखास ओहोटी येते.
तेरी भी चुप;मेरी भी चुप,
समेटाची भाषा ओठी येते.
लोकशाही आणि घराणेशाही,
दोघांचाही एकच वंश आहे !
फक्त तुमच्या आमच्या समोर,
एकमेकांना जहरी दंश आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8450
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
14जानेवारी 2024

No comments:

युद्ध प्रसंग....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- युद्ध प्रसंग पेट्रोल पंपा पंपावरची अवस्था, इंधन भरू किंवा मरू आहे. इंधन टंचाईमुळे खात्री झाली, आखा...