Sunday, January 7, 2024

राजकीय भूकंपाचे अंदाज...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

राजकीय भूकंपाचे अंदाज

राजकीय टीकेचे हल्ले,
धक्का तंत्राने परतवायला लागले.
राजकीय भूकंपाचे अंदाज,
सगळीकडूनच वर्तवायला लागले.

ते जसे एकमेकांचे राजकीय बाप,
तसे तेच त्यांचे राजकीय बंधू आहेत.
ज्याच्या त्याच्या बुडाखाली,
आपल्या भूकंपाचे केंद्रबिंदू आहेत.

धक्के बसले;त्सुनामी आल्या,
तरीही सगळे ऑल इज वेल आहे !
भूकंपाची तीव्रता मोजण्याचे,
ज्याचे त्याचे वेगवेगळे स्केल आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8443
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
7जानेवारी 2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका8मे2024....वर्ष- तिसरे..अंक -336वा

दैनिक वात्रटिका 8मे2024....वर्ष- तिसरे.. अंक -336वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1XewNOM-fFB8BoGskcn2d3Hm3EQ...