Monday, August 31, 2020

बोके आणि ओके

आजची वात्रटिका

----------------------

बोके आणि ओके

जशी आमची मारली,
तशी त्यांची मारून दाखवा.
इकडे जशी काशी केली,
तशी तिकडे करून दाखवा.

सगळ्याच चिडक्या बिब्ब्यांचे,
आव्हानही चिडके असते.
उंदाराला मांजराची लाभाल्याने,
आमचेही थोडक्यात थोडके असते.

दुसऱ्याच्या मुसळाखाली,
आपले कुसळ कुणी झाकू नये !
आपले काय लोंबतेय ते पहावे?
उगीच दुसरीकडे वाकू नये !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7393
दैनिक झुंजार नेता
31ऑगस्ट2020
-----------------------------

 

लॉकडाऊनचे पाढे


आजची वात्रटिका------------------------

लॉकडाऊनचे पाढे

बे एके बे नंतर,
साडेमाडे तीन झाले.
लॉकआणि अनलॉकचे
वेगवेगळे सीन झाले.

तोंड आहे दाबलेले,
वर बुक्क्यांचा मार आहे!
अनलॉकसाठी पूरक
लॉकडाऊन चार आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7392
दैनिक झुंजार नेता
30ऑगस्ट2020

पॉझिटिव्ह-निगेटिव्ह


 आजची वात्रटिका

------------------------------
पॉझिटिव्ह-निगेटिव्ह
कोरोनाची व्याधी म्हणजे,
इब्लिस व्याधी आहे.
तोच सापडतो पॉझिटिव्ह,
ज्याची टेस्ट आधी आहे.
निगेटिव्ह विचार नको,
जरी लस आत्ता नाही.
कोरोना होऊन गेल्याचाही,
कुणा-कुणाला पत्ता नाही.
याचा अर्थ असा नाही,
लस कधीच येणार नाही !
पॉझिटिव्ह विचार करा,
मला कोरोना होणार नाही !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5901
दैनिक पुण्यनगरी
30ऑगस्ट2020

जिवंत समाधी


 आजची वात्रटिका

----------------------------जिवंत समाधी

जिवंत समाध्या म्हणजे,
श्रद्धेबरोबर वादाचा विषय आहे.
आठवतील त्या समाध्या आठवा,
सगळीकडे हाच आशय आहे.

ज्यांना ठेवायची त्यांनी ठेवावी,
श्रद्धेची चिकित्सा झाली पाहिजे !
जिवंत समाध्यातली गुढता,
लोकांसमोर तरी आली पाहिजे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5902
दैनिक पुण्यनगरी
31ऑगस्ट2020
-----------------------------

Thursday, August 27, 2020

दैनिक वात्रटिका 27ऑगस्ट2020

डाऊनलोड लिंक क्लिक करा

ई पास

आजची वात्रटिका
---------------------------------

ई पास

पास -नापासच्या ऐवजी,
आता ई-पासचा बोलबाला आहे.
मजेशीर वाटणारा प्रवास,
कोरोनामुळे अवघड झाला आहे.

ई-पासच्या सक्तीवरून,
अनेक गमती-जमती आहेत !
कोरोनामुळे तरी कळाले,
सामान्यांचे जीवही किमती आहेत !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)

फिल्मी मसाला


 आजची वात्रटिका

--------------------------

फिल्मी मसाला

ज्यांना सगळेच ठाऊक आहे,
ते सगळेच अजूनही मुके आहेत.
हिंदी फिल्म इंडस्ट्रीत म्हणे,
अनेक दिग्गज गांजाफुके आहेत.

अंडरवर्ल्ड आणि गांजाफुक्यांनी,
फिल्म इंडस्ट्री दणदणू लागली !
सध्या तरी फक्त एक 'कंगना'च,
हळूहळू खणखणू लागली !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5898
दैनिक पुण्यनगरी

Wednesday, August 26, 2020

दैनिक वात्रटिका 26 ऑगस्ट2020

 

डाऊनलोड लिंक

शॉर्ट कट


 आजची वात्रटिका

--------------------------

शॉर्ट कट

आज पक्षनिष्ठा शिकविणारे,
शोधा काल नेमके कुठे होते?
दिलजमाईची भाषा करणारे,
बघा किती आडमुठे होते ?

ही काळाची किमया नाही,
हा प्रगतीचा शॉर्टकट आहे !
त्यांच्या तहाना भागल्या,
पण लोकशाहीचा घोट आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7388
दैनिक झुंजार नेता
26ऑगस्ट2020

कोरोनाची प्रेरणा


 आजची वात्रटिका

--------------------------
कोरोनाची प्रेरणा
ऑनलाईन शिक्षण,
हे कोरोनाचे एक लक्षण आहे.
शिक्षण हक्क कायद्याचे,
जणू ऑनलाईन रक्षण आहे.
हेतू सकारात्मक आहे,
प्रयत्नही सकारात्मक आहे.
शिक्षण हक्काचे रक्षण झाले,
पण वास्तव नकारात्मक आहे.
तरीही ऑनलाईन शिक्षण,
ही कोरोनाचीच प्रेरणा आहे !
ऑफलाईन शिक्षणाला
ऑनलाईनची जोड द्या,
ही आमची तरी धारणा आहे !
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5897
दैनिक पुण्यनगरी
26ऑगस्ट2020

Tuesday, August 25, 2020

दैनिक वात्रटिका 25ऑगस्ट2020


25ऑगस्ट2020 डाऊनलोड लिंक-

अंधविश्वास

आजची वात्रटिका
--------------------------

अंधविश्वास

जिथे संधी मिळेल तिथे,
अंधभक्त दिवे पाजळून घेतात.
आपल्या कट्टरतेबरोबर,
अंधभक्त स्वतः उजळून घेतात.

सगळे अंधभक्त सारखेच,
सारखेच तऱ्हेवाईक असतात !
त्यांच्या मते तेच सच्चे अनुयायी ,
अन तेच सच्चे पाईक असतात !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7387
दैनिक झुंजार नेता
25ऑगस्ट2020
-----------------------------

कोरोनाचे 'होम' सायन्स

आजची वात्रटिका
--------------------------

कोरोनाचे 'होम' सायन्स

प्रत्येक घर म्हणजे,
'आय'सोलेशन वार्ड असतो.
बाहेर फक्त नावालाच,
बापाच्या नावाचा बोर्ड असतो.

होम क्वारंटाईच्या जोडीला,
कंटेन्मेंट झोन असतो.
हे सांगायची गरज नाही,
व्हेंटिलेटरवर कोण असतो?

जिथे नांदतो प्रेम- जिव्हाळा,
तेच घर स्ट्रॉंग आणि फीट असते !
तोच असतो घराचा ऑक्सिजन,
तेच घराचे पीपीई किट असते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5896
दैनिक पुण्यनगरी
25ऑगस्ट2020

Monday, August 24, 2020

चौकशी

आजची वात्रटिका
-----------------------------

चौकशी

आडवे-तिडवे काही नाही,
सगळे सरळ,सरधोपट आहे.
ज्याचे मिठू मिठू चाललेय,
तो म्हणे 'बोलका पोपट' आहे.

आज इथल्या उंदराची साक्ष,
इथल्या मांजरा-मांजरा आहे !
सीबीआय कडून चौकशी करा,
पोपटाला कुणाचा पिंजरा आहे?

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-5895
दैनिक पुण्यनगरी
24ऑगस्ट2020

दैनिक वात्रटिका 24ऑगस्ट2020

दैनिक वात्रटिका
आजचा अंक
24ऑगस्ट2020
डाऊनलोड लिंक-

Sunday, August 23, 2020

दाऊद न्यूज

आजची वात्रटिका
------------------------------------------
दाऊद न्यूज
दाऊद जिवंत आहे,
दाऊदला कोरोना झाला आहे.
आत्तापर्यंत दाऊद,
चक्क सहा वेळा मेला आहे.
गँगस्टार म्हणून दाऊद,
आधीच प्रख्यात आहे !
आता मरून जिवंत होण्यात,
तेवढाच विख्यात आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7385
दैनिक झुंजार नेता
23ऑगस्ट2020

 

गणपतीचे मनोगत

आजची वात्रटिका
---------------------------

गणपतीचे मनोगत

उत्साह आहे,भक्तीभाव आहे,
पण नेहमीचा जाच नाही.
जल्लोष आहे,आनंद आहे,
पण पूर्वीचा नंगानाच नाही.

पर्यावरणपूरक,मंगलकारक,
यंदा असे माझे स्वागत आहे.
यंदा माझ्या आधी कोरोना आला,
त्याचे परिणाम मी बघत आहे.

जसा मी येतो,तसा मी जातो,
मग कोरानालाही जावे लागेल !
कोरोनाचे वाहक न होता,
कोरानावर स्वार व्हावे लागेल !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-5894
दैनिक पुण्यनगरी
23ऑगस्ट2020

दैनिक वात्रटिका 23 ऑगस्ट2030

दैनिक वात्रटिका 23 ऑगस्ट2030

दैनिक वात्रटिका 22ऑगस्ट2020

दैनिक वात्रटिका
आजचा अंक
22ऑगस्ट2020

डाऊनलोड लिंक-

Saturday, August 22, 2020

भुल-भुलैय्या

आजची वात्रटिका
---------------------

भुल-भुलैय्या
सगळ्या न्यायाच्या गोष्टी,
तेंव्हा खोट्या वाटू लागतात.
विचारवंतांच्या खुनापेक्षा,
नट- नट्यांच्या आत्महत्या ;
जेंव्हा मोठ्या वाटू लागतात.
कुणाचाही मृत्यू वाईटच,
प्रत्येकाचे एक मूल्य आहे !
दुनिया झगमगाटाला भुलते,
याचेच तर खरे शल्य आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7380
दैनिक झुंजार नेता
22ऑगस्ट2020

अजब न्याय

 आजची वात्रटिका

---------------------------
एका सुशांतने मीडियाला,
अशांत करून सोडले आहे.
सगळे विषय सोडून,
मीडियाला तेवढेच पडले आहे.
मेलेल्याला, परत परत मारून,
त्याच्या अब्रुचे धिंडवडे आहेत !
ज्यांनी राखला संयम,
असे मीडियात फार थोडे आहेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5894
दैनिक पुण्यनगरी
22ऑगस्ट2020

Friday, August 21, 2020

वऱ्हाड आणि वाजंत्री

 आजची वात्रटिका

---------------------------
वऱ्हाड आणि वाजंत्री
खाली वेगळे सरकार;
वर वेगळे सरकार असले की,
त्याचा धोरणात्मक त्रास होतो.
मात्र आपणच सत्तेत असल्याचा,
प्रत्येक कार्यकर्त्याला भास होतो.
कार्यकर्ते असतात रस्त्यावर,
सत्तेत तर मंत्री-संत्री असतात !
मंत्र्या-संत्र्यांच्या वऱ्हाडाला,
कार्यकर्ते फुकटे वाजंत्री असतात !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5893
दैनिक पुण्यनगरी
21ऑगस्ट2020

राजकीय सुधारणा

 आजची वात्रटिका

---------------------------

राजकीय सुधारणा

आपले सगळे राजकीय पक्ष,
जुन्या वळणावर गेले नहीत.
कोरोनामागे विरोधकांचा हात,
असे आरोप कुणी केले नाहीत.

परस्परांवर चिखलफेक नाही,
कोरोना अशी एकच गोष्ट आहे !
कोरोनाची सुपर स्पेशॅलिटी,
अगदी संदर्भासहीत स्पष्ट आहे!!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7379
दैनिक झुंजार नेता
21ऑगस्ट2020

Thursday, August 20, 2020

कोरोनाचे किस्से

 आजची वात्रटिका

-----------------------------------

कोरोनाचे किस्से

हास्य हरपले जात आहे,
आयुष्य करपले जात आहे.
कोरोनाचे जहर असे,
जगभर झिरपले जात आहे.

कोरोनापूर्व आणि कोरोनोत्तर,
असे काळाचे हिस्से होतील !
कोरोनाच्याच संकटाचे,
उद्या विनोदी किस्से होतील !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7378
दैनिक झुंजार नेता
20ऑगस्ट2020

रिकव्हरी रेट

 आजची वात्रटिका

-------------------------------------

रिकव्हरी रेट

यंदा पर्जन्य राजाची
भरभरून भेट आहे.
सरासरीपेक्षा जास्त,
रिकव्हरी रेट आहे.

कोरोनाच्या दुःखावर,
पावसाची फुंकर आहे!
निसर्गच खेळीया,
तोच खरा अँकर आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5892
दैनिक पुण्यनगरी
20ऑगस्ट2020

Wednesday, August 19, 2020

दैनिक वात्रटिका

कोरोनांतर

 आजची वात्रटिका

---------------------------------------------------

कोरोनांतर

त्यांचा कोरोना वेगळा आहे,
आपला कोरोना वेगळा आहे.
ते खाजगी दवाखान्यात,
आपण सरकारीत;
आपला खर्च आगळा आहे.

त्यांच्याप्रमाणे आपणही
कोरोना फायटर आहोत !
आपल्या नशिबाचे,
आपणच रायटर आहोत !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5891
दैनिक पुण्यनगरी
19ऑगस्ट2020

अँटीजन टेस्ट

 आजची वात्रटिका

------------------------------------

अँटीजन टेस्ट

अँटीजन टेस्ट म्हणजे,
जणू ट्वेन्टी-ट्वेन्टी आहे.
सामान्यांची जनभावना,
टेस्टच्या अँटी आहे.

लोकभावना बदलायला,
तसा खूप वाव आहे !
गोंधळात गोंधळ,
कोरोनाचे दुसरे नाव आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7377
दैनिक झुंजार नेता
19ऑगस्ट2020

Tuesday, August 18, 2020

कोरोना थेअरी

 आजची वात्रटिका

---------------------------------------------------

कोरोना थेअरी

खोकायची बंदी आहे,
शिंकायचीही चोरी आहे.
नाकातोंडाशी आलेली,
कोरोनाची थेरी आहे.

साधी सर्दीसुद्धा,
कोरोनाची वर्दी आहे!
शंका-कुशंकांची
मनमनात गर्दी आहे!!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7376
दैनिक झुंजार नेता
18ऑगस्ट2020

मेडीकल बुलेतीन

 आजची वात्रटिका

------------------------------------

मेडीकल बुलेतीन

कंपाउंडर म्हणाले,
जिंदाबाद,जिंदाबाद असो
डॉक्टर म्हणाले,
मुर्दाबाद,मुर्दाबाद असो.

डॉक्टर-कंपाउंडर वादात,
राऊतांची ठिणगी वाटते !
राऊत म्हणाले,कोटी केली;
इतरांना ती फुणगी वाटते !

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5890
दैनिक पुण्यनगरी
18ऑगस्ट2020
-----------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील
आणि साप्ताहिक सूर्यकांती मधील
सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त निवडक
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा

https://suryakantdolase.blogspot.com
----------------------------
विशेष सूचना-
1)माझ्या वात्रटिकात काही आक्षेपार्ह वाटले तर माझ्या मूळ पोस्ट तपासाव्यात किंवा माझ्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून खात्री करावी.

2)lसदरील वात्रटिकांमध्ये काही टायपिंग मिस्टेक असेल तर मला त्वरित कळवा.

3) जे वात्रटिका शेअर करीत आहेत त्यांचे विशेष आभार

4)आता रोज नव्या बरोबर अनेक जुन्या वात्रटिकांचा खजिना वाचण्यासाठी वाचत रहा

दैनिक वात्रटिका

खास वात्रटिकांसाठी वाहिलेले ऑनलाईन दैनिक !!

-सूर्यकांत डोळसे
18ऑगस्ट2020

बिहार पॅटर्न .... मराठी वात्रटिका

  आजची वात्रटिका --------------------- बिहार पॅटर्न जसे कर्म तसे फळ, हे लगेच प्रत्यक्षात आले. महाराष्ट्रात जे कमावले, ते बिहारमध्ये गमावले ग...