Wednesday, August 12, 2020

पॉलिवूड आणि बॉलिवूड

 आजची वात्रटिका

----------------------------

पॉलिवूड आणि बॉलिवूड

राजकारण आणि चित्रपट
यांचे पारंपरिक नाते आहे.
म्हणून तर राजकारण,
चित्रपटाप्रमाणे वळण घेते आहे.

पॉलिटिक्स मध्ये ड्रामा,
बॉलिवूडमध्ये पॉलिटिक्स आहे !
पॉलिवूड आणि बॉलिवूडच्या
यशाचे गणित अगदी फिक्स आहे !

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------------
चिमटा-5886
दैनिक पुण्यनगरी
12ऑगस्ट2020

No comments:

सोशल स्टेटस ......प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- सोशल स्टेटस आजच्यासारखा राजकीय स्वार्थ, आम्ही यापूर्वी कधीच पाहिला नाही. शुभेच्छासारख्या शुभेच्छांनासुद्...