Tuesday, August 11, 2020

फितुरी

 आजची वात्रटिका

----------------------------
फितुरी

लोक कमालीचे मूर्ख असूनही
कायदे मोडण्यात चतुर आहेत.
हेच अकलेचे नासके कांदे,
कोरोनालाही फितुर आहेत.

मूर्खांच्या फंद-फितुरीकडे,
शहाण्यांचाही कानाडोळा आहे !
कोरोनाचे वाढत्या आकड्यांनी,
गावोगावच्या पोटात गोळा आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5885
दैनिक पुण्यनगरी
11ऑगस्ट2020

No comments:

दैनिक वात्रटिका29मार्च2024....वर्ष- तिसरे..अंक -296वा

दैनिक वात्रटिका 29मार्च2024....वर्ष- तिसरे.. अंक -296वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/16Y5CPWm1eVe-mvmywM7Inn...