Friday, August 14, 2020

कोरोनाचा लसावी

 आजची वात्रटिका

----------------------------

कोरोनाचा लसावी

येणार येणार म्हणतात तरी,
लस काही येत नाही.
सगळे पाहुणचार झोडूनही,
कोरोना काही जात नाही.

सुंठेवाचून जायला काही,
कोरोना साधा खोकला नाही !
तो तो निगेटिव्ह आहे,
जो टेस्टला उभा ठाकला नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7373
दैनिक झुंजार नेता
14ऑगस्ट2020

No comments:

खोके आणि धोके... मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका

आजची वात्रटिका  -------------------- खोके आणि धोके  खोक्या आणि धोक्याच्या जीवावर, राजकीय पक्षांची वाटणी आहे.  खोक्या आणि धोक्याच...