Monday, October 31, 2022

आरपार... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

आरपार

काढा काढा खुशाल काढा,
सगळेच परस्परांची मापे काढा.
स्वतःला पुण्यवान समजणाऱ्यांची,
सगळीच्या सगळी पापे काढा.

कुणाच्या मापामध्ये पाप नको,
कुणाच्या पापामध्ये थाप नको.
दुसऱ्यासाठी थाळ्या वाजवताना,
आपल्याच घरात साप नको.

दुधाचे दूध;पाण्याची पाणी,
घ्यायचा तो सूड घेऊन टाका !
नसता तुम्हीच एकमेकांना,
उघड क्लीन चिट देऊन टाका !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6620
दैनिक पुण्यनगरी
31ऑक्टोबर2022

 

Sunday, October 30, 2022

रियालिटी चेक... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

रियालिटी चेक

व्हाट्स ॲपचे तासभर बंद पडणे,
साऱ्या जगाला महागात पडले गेले.
कुणा कुणाचे झाले ब्रेक अप,
कुणाचे जुळता जुळता मोडले गेले.

आपले व्यक्ती स्वातंत्र्य,
जणू मीडियात निलाम झाले आहे !
आभासी जगापुढे,
जणू खरे जग गुलाम झाले आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8082
दैनिक झुंजार नेता
30ऑक्टोबर2022

 

प्रकल्प संशोधन.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

प्रकल्प संशोधन

अमुक गेला,तमुक गेला,
आता नवा,विकल्प आहे.
खरे कोण?खोटे कोण?
हा संशोधन प्रकल्प आहे.

सत्तांतर झाले असले तरी,
सत्ताधारी कुठे भिन्न आहेत?
संशोधन करता करता,
सामान्य लोक सुन्न आहेत!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6619
दैनिक पुण्यनगरी
30ऑक्टोबर2022

 

Saturday, October 29, 2022

कडू सत्य... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
कडू सत्य
जे खंबीर होते त्यातलेच,
हळूहळू पघळू लागले.
खोक्यांचे गौडबंगाल,
जाहीर उगळू लागले.
बोलायला कडू आहे,
ऐकायलाही कडू आहे !
बच्चू,खरा धक्का हा की,
तो आपलाच भिडू आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8081
दैनिक झुंजार नेता
29ऑक्टोबर2022

 

नोटांवरची फोटोलॉजी... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

नोटांवरची फोटोलॉजी

नोटांवर महापुरुषांचे फोटो हवेत,
राजकारणी आग्रह धरू लागले.
सगळे कॅश करून झाल्यासारखे,
आता नोटाही कॅश करू लागले.
तुमच्या भावना सच्चा असतील,
त्याचे प्रदर्शन असे थिल्लर नको.
झाले तेवढे अवमूल्यन पुरे आहे,
महापुरुषांची पुन्हा चिल्लर नको.
देव आणि देवतांच्या विटंबनेला,
चलनातून पुन्हा नवी चालना नको !
राष्ट्रपित्याच्या बंद्या रुपयाची,
भावनेपोटी कुणाशी तुलना नको!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6618
दैनिक पुण्यनगरी
29ऑक्टोबर2022

 

Wednesday, October 26, 2022

ग्रहणफल ... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

ग्रहणफल

बदनामीचे दुःखही,
आनंदाने समजून घ्यावे लागते.
म्हणून प्रकाशाच्या सम्राटालाही,
ग्रहणामधून जावे लागते.

झाकाळलो गेलो म्हणजे,
संपलो असा अर्थ होत नाही.
अंधाराच्या साम्राज्यात,
जुंपलो असा अर्थ होत नाही.

दाटलेला अंधार म्हणजे,
घडी दोन घडीचा डाव असतो !
झाकाळून टाकल्याचा,
अंधारप्रिय लोकांचा आव असतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6616
दैनिक पुण्यनगरी
26ऑक्टोबर2022

 

Tuesday, October 25, 2022

दिवाळीचा शिमगा,,, मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

दिवाळीचा शिमगा

राजकारण्यांचे पराक्रम,
चमत्कारिक ठरू शकतात.
अगदी दिवाळीचाही शिमगा,
राजकारणी करू शकतात.

कधी शिमगा,कधी दिवाळी,
कधी कधी तर कॉकटेल असते!
वाट्टेल तशी बोंबाबोंब करूनही,
त्यांचे मात्र ऑल इज वेल असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6615
दैनिक पुण्यनगरी
25ऑक्टोबर2022

 

राजकीय बदल... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
राजकीय बदल

पूर्वी नेते गळाला लावायचे,
आता पक्षच गळाला लावू लागले.
विरोधकांच्या नामोनिशाणीचे,
अस्तित्वच धोक्यात येऊ लागले.
भित्यापोटी ब्रह्मराक्षस,
अशी सगळी राजकीय तऱ्हा आहे!
जो होता खंदा पाठीराखा,
आज त्याच्या हातामध्ये सुरा आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8079
दैनिक झुंजार नेता
25ऑक्टोबर2022

 

दैनिक वात्रटिका18एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -316वा

दैनिक वात्रटिका 18एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -316वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1H7R0AkBWdW9aUDYPkGh5Z...