Tuesday, October 18, 2022

सांस्कृतिक विकृती....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

सांस्कृतिक विकृती

उघड्यांनी आणि नागड्यानी,
एकमेकांना काही हसायचे नाही.
आपापले डोळे झाकले की,
कुणालाच काही दिसायचे नाही.

एकदा असे ठरले की,
नागवे नाचायला मोकळे होतात.
आपल्या तथाकथित संस्कृतीचे,
पाढे वाचायला मोकळे होतात.

संस्कृतीचे उदो उदो केल्याशिवाय,
विकृती काही जोपासता येत नाही!
भावनिकतेच्या लाटेत मग,
विकृती काही तपासता येत नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
दैनिक वात्रटिका
18ऑक्टोबर2022

 

No comments:

daily vatratika...28feb2025