Sunday, October 23, 2022

दिवाळीचे वास्तव... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

दिवाळीचे वास्तव

काल सत्तेवर त्यांची पाळी होती,
आज सत्तेवर यांची पाळी आहे.
आलटून पालटून का होईना,
त्यांची दिवाळी एके दिवाळी आहे.

सत्ताधारी वेगळे असले तरी,
काही लाभार्थी मात्र कॉमन आहेत.
बळी राजा ओळखून चुकलाय,
आज कुठे कुठे खरे वामन आहेत?

सत्ता येता घरा-दारा,
तोच त्यांचा दिवाळी दसरा आहे !
बांधा बांधावरती फुटलेले बांध,
स्वतःला स्वतःचाच आसरा आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6613
दैनिक पुण्यनगरी
23ऑक्टोबर2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...