Sunday, October 16, 2022

समायोजन... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
समायोजन
कुणी कुणालाही भिडू लागले,
कुणी कुणालाही नडू लागले
कालपर्यंत जे गोड लागत होते,
ते आज अचानक कडू लागले.
कालपर्यंत जो कडू होता,
तोच आजचा नवा भिडू आहे.
तसे सगळेच अपचनीय,
त्यामुळेच पोटात गुडूगुडू आहे.
तरीही सगळे पचवावे लागते,
तरीही सगळे रिचवावे लागते!
जेवढे राजकारण नीच आहे,
त्यापेक्षाही निच व्हावे लागते!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8070
दैनिक झुंजार नेता
16ऑक्टोबर2022
 

No comments:

खोके आणि धोके... मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका

आजची वात्रटिका  -------------------- खोके आणि धोके  खोक्या आणि धोक्याच्या जीवावर, राजकीय पक्षांची वाटणी आहे.  खोक्या आणि धोक्याच...