Thursday, October 13, 2022

रडीचे राजकारण... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

रडीचे राजकारण

कुणी म्हणतो, ईडीचे आहे;
कुणी म्हणतो,फोडाफोडीचे आहे.
यात कसलाच वाद नाही,
या घडीचे राजकारण रडीचे आहे.

रडीच्या राजकारणाच्या तर,
अगदी नको तिथे उड्या आहेत.
सरळ सरळ नसल्या तरी,
अगदी नथीतून खोड्या आहेत.

आपले जाहीर हसे झाले की,
त्यांना रडूसुद्धा फुटले जाते!
आपल्या रडीच्या डावालाच,
राजकीय डावपेच म्हटले जाते!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6606
दैनिक पुण्यनगरी
13ऑक्टोबर2022

 

No comments:

महाराष्ट्र माझा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...