Thursday, October 13, 2022

फाटाफूट... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

फाटाफूट

फाटाफुटीच्या तडाख्यातून,
अजून तरी कुणी सुटला नाही.
असा एक तरी पक्ष दाखवा,
जो अजून तरी फुटला नाही.

कोणतीही पक्षीय फाटाफूट,
कधी उभी,कधी आडवी असते!
कोणतीही पक्षीय फाटाफूट,
धोकादाय आणि कडवी असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8067
दैनिक झुंजार नेता
13ऑक्टोबर2022

 

No comments:

महाराष्ट्र माझा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...