Sunday, October 9, 2022

पापक्षालन.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

पापक्षालन

करायचे तर हिरो करा,
नसता त्यांना व्हिलन करा.
पण भागवातांची सूचना आली,
आत्याचाराचे पापक्षालन करा.

पापक्षालन शाब्दिक नको,
त्यात आंतरिक ओढ पाहिजे.
बारामतीची सूचना आली,
त्याला कृतीची जोड पाहिजे.

पापक्षालनाची सूचना,
वादाच्या भोवऱ्यात आहे !
इकडे आड तिकडे विहीर,
तगमग मात्र पोहऱ्यात आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
दैनिक वात्रटिका
9ऑक्टोबर2022

 

No comments:

दुष्काळी पाहुणचार ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- दुष्काळी पाहुणचार दुष्काळ पाहणी दौरा बघून, आमचे मतही ठाम झाले. एकाचा पाहुणचार करताना, दुसरेच हकन...