Wednesday, October 12, 2022

प्रॅक्टिकल थॉट.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
प्रॅक्टिकल थॉट
नैतिक आणि अनैतिकतेला,
राजकारणात थारा नसतो.
दोघांचाही आग्रह धरणे,
हा अट्टहास काही बरा नसतो.
राजकारणात जशी थेअरी वेगळी,
तसे प्रॅक्टिकलही वेगळे असते!
तरीही प्रॅक्टिकल महत्त्वाचे आहे,
यामध्येच तर सगळे असते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-8071
दैनिक झुंजार नेता
12ऑक्टोबर2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...