Saturday, October 22, 2022

दे धक्का... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

दे धक्का

कुणासोबत कुणालाही पाहून,
लोकांना आता धक्के बसत नाहीत.
लोकांनाही सवय झाल्यामुळे,
धक्केसुद्धा धक्के असत नाहीत.

लोकांना धक्का ना बसणे,
हेसुद्धा खूप धक्कादायक आहे!
हे जेवढे धक्कादायक आहे,
त्यापेक्षा विचार करण्यालायक आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-8076
दैनिक झुंजार नेता
22ऑक्टोबर2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...