Sunday, December 30, 2012

एकमेंका साह्य्य करू

पतपेढ्या वाटल्या आहेत,
बॅंका लुटल्या आहेत.
लुटारूंच्या टोळ्या
लुटालुट करीत सुटल्या आहेत.

सहकाराच्या नावाखाली
स्वाहाकाराच्या शाखा आहेत !
कायद्याच्या फटीत
कायद्याच्याच मेखा आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बी)

व्यर्थ न हो बलिदान!Friday, December 28, 2012

राजकीय अतिक्रमण

राजकारण घुसायचे राहिले
असे काहीच उरले नाही.
एकही गाव असे नाही
ज्याला राजकारणाने घेरले नाही.

कुठे घुसले आहे,
कुठे घुसवून घेतले आहे !
जिथे जिथे संधी दिसेल
तिथे तिथे राजकारण मातले आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

वाचाळ आणि कुचाळ


Wednesday, December 26, 2012

जातीचे उपयोग

दै.झुंजार नेता मध्ये गेली १४ वर्ष अखंडपणे चालु असलेल्या माझ्या ’फेरफटका’ या सदारातील आजची ४६६९ क्रमांकाची  वात्रटिका...

                           

ग्रामपंचायतींचा ताबा

ही अमक्याच्या ताब्यात असते,
ती तमक्याच्या ताब्यात असते.
नको त्याची मालकी
नको त्याच्या सुभ्यात असते.

पाठीवर विजयाचा गुलाल,
कपाळी कुणाचा तरी टिळा असतो !
स्वातंत्र्यापेक्षा गुलामीचाच
ग्राम पंचायतींना लळा असतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)


Wednesday, December 19, 2012

छुपे बलात्कार

मिडीयातल्या जाहिराती
स्त्रियांना तंग करतात.
स्त्रीदेहाचा बाजार मांडून
स्त्रीयांचा विनयभंग करतात.

वखवखलेली नजर
नको तिथे खिळवली जाते !
जाहिरातींच्या माध्यमातून
लैगिंगता चाळवली जाते !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

ज्याची त्याची गरज


Sunday, December 16, 2012

नकटेशाही जिंदाबाद !


नकटे कधी एकटे नसतात,
नकट्यांना नकट्यांची साथ असते.
आपापल्या नाकाची उंची
नकट्यांना चांगलीच ज्ञात असते.

नकटे नकटे असले तरी
एकमेकांचे नाक खाजवत असतात !
नकट्यांची एकी अशी की,
नकटे नाकेल्यांनाही लाजवत असतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)

चौकशीचा अहवाल


Saturday, December 15, 2012

जगबुडवे

जगबुडवे

जसे जग वाचवू म्हणणारे आहेत,
तसे जग बुडवे आहेत.
सांगायची गरज नाही,
नेमके कोण भडवे आहेत?

"जगबुडी येणार,जगबुडी येणार,"
हेच भडवे ओरडत असतात !
भविष्याची भीती दाखवून
वर्तमान चिरडत असतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

गोंधळावरचे उपाय


Tuesday, December 11, 2012

पुन्हा नामांतर

नामांतराला विरोध करणारेच
आज नामांतर मागत आहेत.
काल ज्याला विरोध केला
आज तेच तसे वागत आहेत.

सोयीनुसार सुलटी,
सोयीनुसार पलटी आहे!
नामांतराची भूमिका
कालच्यापेक्षा उलटी आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

हुकमी खेळ


Sunday, December 9, 2012

पंचवार्षिक झुंज

कोंबड्यांशी कोंबड्यांची
जबरदस्त झुंज लावली जाते.
ग्रामीण राजकारणावर
अशीच तर पकड ठेवली जाते.

कोंबडेही चोंबडे असतात,
त्यांना लावा-लावी कळत नाही !
कोंबडे सवयीचे गुलाम झाल्याने
पंचवार्षिक झुंज टळत नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

तथाकथित पुरोगामी


Saturday, December 8, 2012

धोरणात्मक ’ठोक’ ताळा

जसे बोलले तसे
गल्लीतही वागले जात नाही.
आपल्या बोलल्या शब्दांना
दिल्लीतही जागले जात नाही.

बोलायचे एक,करायचे दुसरे
इथेच तर खरा घोळ आहे !
हा ठोकीचा व्यापार तर
दलांलासाठी किरकोळ आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)


उपनवरा


Thursday, December 6, 2012

सत्तेची चटक

सत्तेची चटक लागली की,
सत्तेशिवाय चैन पडत नाही.
सत्तेचे व्यसन काही
चेहर्‍यावरून दडत नाही.

सत्तेशिवाय नेता नेता
नेमका सांगु कसा असतो ?
जसा पाण्याच्या बाहेर
तडफडणारा मासा असतो !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)

आत्मपरीक्षण


Monday, December 3, 2012

पाणी पेटते आहे

पाण्यासाठी वाद-प्रतिवाद
मालकीचेही दावे होवू लागले.
नको तिथे पाणी सोडणारे
चक्क पाण्यात पाहू लागले.

जिल्ह्या-जिल्ह्यात संघर्ष,
सावधान,पाणी पेटते आहे !
पाण्यामुळे महायुद्ध होईल
हे अनुभवावरून पटते आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

राजकीय धंदेवाईकपणा


कोळेगावची आकाशवाणी

आपला आंधळा स्वार्थच
आपला शत्रु बनत असतो.
लालसा आणि मोहच
संकटांना घरी आणत असतो.

आपल्याला आपल्या मोहाचाही
राग राग करता आला पाहिजे !
बेवारस वस्तु सापडली तरी
तिचा त्याग करता आला पाहिजे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

बिहार पॅटर्न .... मराठी वात्रटिका

  आजची वात्रटिका --------------------- बिहार पॅटर्न जसे कर्म तसे फळ, हे लगेच प्रत्यक्षात आले. महाराष्ट्रात जे कमावले, ते बिहारमध्ये गमावले ग...