Showing posts with label फेरफटका. Show all posts
Showing posts with label फेरफटका. Show all posts

Wednesday, April 1, 2026

दावेदारी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका 
-----------------------------

दावेदारी

इतिहासासारख्या इतिहासाला, 
वेशीवरती  टांगायला लागले.
ऐतिहासिक व्यक्तींवरतीही, 
आपला हक्क सांगायला लागले.

अनैतिहासिक दाव्यांमुळे,
वादळ उठायला लागले.
अहिंसक विचारही मग,
हिंसक वाटायला लागले.

वाटेल तसे बरळू नये,
जरी संविधानिक हक्क आहे !
अनैतिहासिक दावे बघून,
प्रत्यक्ष इतिहासही थक्क आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9234
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता 
1 एप्रिल 2026
----------------------------

नमस्कार,
मराठी वात्रटिका
*विशेष सूचना-*
1)माझ्या वात्रटिकात काही आक्षेपार्ह वाटले तर माझ्या मूळ पोस्ट तपासाव्यात किंवा प्रत्यक्ष संपर्क साधून खात्री करा.
२)सदरील वात्रटिकमध्ये काही टायपिंग मिस्टेक असेल तर मला कळवा.
३) वैयक्तिक अभिप्रायाचे स्वागत.
जे वात्रटिका शेअर करत आहेत त्यांचे विशेष आभार.
4) माझ्या प्रसिद्ध असलेल्या 19 हजारांपेक्षा जास्त वात्रटिका  पैकी  10 हजार पेक्षा जास्त वात्रटिका एका क्लिकवर वाचू शकता
https://suryakantdolase.blogspot.com/?m=1
५) माझ्या बाल वात्रटिका वाचण्यासाठी क्लिक करा
https://balsuryakanti.blogspot.com
६) सर्व काही एकाच ठिकाणी...एकाच ठिकाणी !! अर्थात *सप्ताहिक* *सूर्यकांती* खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पाहिले आणि एकमेव साप्ताहिक https://weeklysuryakanti.blogspot.com
7) माझ्या *सूर्यकांती लाईव्ह* किंवा यूट्यूब चॅनलला कृपया भेट द्या...लाईक करा...*सबस्क्राईब* करा !! https://www.youtube.com/user/suryakantdolase
8 )आजपर्यंतचे सर्व वात्रटिका संग्रह डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा
https://vatratikaebooks.blogspot.com
९)माझ्या शेकडो कविता वाचण्यासाठी क्लिक करा
https://surykanti.blogspot.com
१०) माझ्या विडंबन कविता वाचण्यासाठी किलक करा..
https://suryakanti1.blogspot.com
११) माझ्या वात्रटिकांचे समीक्षण अर्थात ग्रोकायन वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://grokaayan.blogspot.com/
१२) मोबाईलवर दररोज वात्रटिकांचे सर्व प्रकारचेअपडेट मिळवण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करून माझ्या व्हाट्सअप चॅनल  मध्ये जॉईन होऊ शकता.
.https://whatsapp.com/channel/0029Vb6SsxH0gcfSYNSWgo1s
प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-सूर्यकांत डोळसे

Sunday, July 11, 2021

नामांतर

आजची वात्रटिका
--------------------

नामांतर

इकडून तिकडे,तिकडून तिकडे;
फक्त हेच त्यांचे काम असते.
इकडे आयाराम, तिकडे गयाराम;
कर्म एकच, बदलेले नाम असते.

आयाराम असोत वा आयाराम,
फक्त निमित्त शोधत राहतात!
इकडून तिकडे,तिकडून इकडे;
पक्षीय समतोल साधत राहतात!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------
फेरफटका-7644
दैनिक झुंजार नेता
11जुलै2021

 

Friday, March 5, 2021

अफवांची फुणगी

आजची वात्रटिका
----------------------
अफवांची फुणगी
वाढत्या महागाईला
अफवांची फुणगी आहे.
वाढत्या महागाईत
लॉक डावूनची ठिणगी आहे.
कोरणाने मरण स्वस्त करून,
जगणे महाग केले आहे !
वाढत्या महागाईला,
वाढण्यास भाग केले आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------
फेरफटका-7539
दैनिक झुंजार नेता
5मार्च2021

 

Saturday, February 27, 2021

समानता

आजची वात्रटिका

----------------------

समानता

कायद्याची जाहीर टवाळी,
कायद्याची टिंगल आहे.
कायद्याच्या तमाशासोबत,
दंगलसुद्धा मंगल आहे.

धनदांडग्यांच्या पायाशी,
कायद्याचे इमान आहे !
फक्त न्यायालयाच्या भिंतीवर,
कायदा सर्वांना समान आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------------
फेरफटका-7549
दैनिक झुंजार नेता
27फेब्रुवारी2021

 

Thursday, January 21, 2021

गावाकडच्या गोष्टी

आजची वात्रटिका
----------------------------
गावाकडच्या गोष्टी
स्थानिक राजकारणाची,
वेगळीच ख्याती आहे.
चांगल्या चांगल्या लोकांची,
त्यांच्या गावातच माती आहे.
दिल्लीपेक्षा गल्लीचे,
राजकारण कोडगे आहे !
गावा-गावाच्या वेशीवर,
लोकशाहीचे थडगे आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------------
फेरफटका-7502
दैनिक झुंजार नेता
21जानेवारी2021

 

Wednesday, January 13, 2021

खमंग चर्चा

आजची वात्रटिका
----------------------

खमंग चर्चा

आरोप आणि प्रत्यारोपातून, सूडाचे राजकारण खेळले जाते. साध्या-साध्या गोष्टीला, तिखट-मीठ चोळले जाते.

एकदा तिखट मीठ लागले की, खमंग चर्चा रंगू लागतात ! वास्तवयापेक्षा वेगळेच काही, लोक एकमेकांना सांगू लागतात !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ------------------------------------- फेरफटका-7496 दैनिक झुंजार नेता 13जानेवारी2021

 

Wednesday, December 30, 2020

न्यू कोरोना

आजची वात्रटिका
----------------------------
न्यू कोरोना
ब्रिटनमधून आलेला कोरोना,
पहिल्यापेक्षाही ग्रेट आहे.
पहिल्यापेक्षा त्याच्या वाढीचा,
चक्क सत्तार पट रेट आहे.
पहिला कोरोना जाण्याअगोदर,
नवा कोरोना हजर आहे !
बेफिकीर आणि गाफिलांवर
कोरोनाची मेहरनजर आहे !!
-,,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------
फेरफटका-7486
दैनिक झुंजार नेता
30डिसेंबर2020
------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा

 

Monday, December 21, 2020

राजकीय पात्रता

आजची वात्रटिका
------------------------

राजकीय पात्रता

लोकांना लोकादेखत, गंडवता आले पाहिजे. लोकांना वाट्टेल तेंव्हा, तंडवता आले पाहिजे.

एवढ्या भांडवलावर, दिल्ली गाठू शकता! फक्त गल्लीच काय? दिल्ली रेटू शकता !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ------------------------------------- फेरफटका-7481 दैनिक झुंजार नेता 21डिसेंबर2020

 

Thursday, November 12, 2020

गाऱ्हाण्यांची तक्रार

आजची वात्रटिका
-------------------------

गाऱ्हाण्यांची तक्रार

तिकडे पिंगा घालायचा सोडून, इकडे रुंजी घालीत आहेत. आपल्या मागणे आणि गाऱ्हाणे, लोक कृष्णकुंजी घालीत आहेत.

प्रथम सत्ताधारी,मग विरोधक, तरी तक्रारी भलतीकडे आहेत !! तिघे तिघे सत्तेवर असूनही, गाऱ्हाणी मात्र चौथीकडे आहेत !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ------------------------ फेरफटका-7458 दैनिक झुंजार नेता 12नोव्हेंबर2020

 

दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...