Sunday, September 20, 2026

अब्रूचा पंचनामा ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका.

आजची वात्रटिका
----------------------------
अब्रूचा पंचनामा
आरोपांच्या चिखलफेकीला,
भलताच बहर आला आहे.
अब्रू नुकसानीच्या दाव्याचा
हल्ली जास्तच बोलबाला आहे.
हा त्यांच्या ट्रोल होत आहे,
तो यांच्याकडून ट्रोल होत आहे.
परस्परांच्या अब्रूचा,
सोशल मीडियावर सेल होत आहे.
तुम्ही आम्ही कुणीच,
एकट्याला दोष देऊ शकत नाही !
एकमेकांच्या घेतलेल्या अब्रूची,
नुकसान भरपाई होऊ शकत नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9403
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
19सप्टेंबर 2026

 

No comments:

श्रेयवाद....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- श्रेयवाद जसे कधीकधी श्रेय वाटले जाते, तसे नेहमीच श्रेय लाटले जाते. ज्याला ज्याला श्रेय लुटता येई...