Sunday, September 27, 2026

दुष्काळाचे वास्तव...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
दुष्काळाचे वास्तव
दुष्काळाची घोषणा म्हणजे,
शेतकऱ्यांच्या दुःखावर उतारा आहे.
विरोधकांच्या आक्रमणावर,
जणू दुष्काळाचा पोतारा आहे.
दुष्काळ दुष्काळ असतो,
त्याला ना मनाची ना जनाची आहे.
दुष्काळ कधी बघत नाही,
येथे सत्ता नेमकी कुणाची आहे ?
सत्ताधारी आणि विरोधक,
संघर्ष जिथल्या तिथे राहिला पाहिजे !
राजकारणाच्या पलीकडे जाऊन,
म्हणूनच दुष्काळ पाहिला पाहिजे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9410
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
27 सप्टेंबर 2026

 

No comments:

दुष्काळाच्या झळा .....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- दुष्काळाच्या झळा पावसाने आपला हात, असा काही ताणला आहे. पावसाळ्यासारख्या पावसाळा, यंदा चक्क उन्हा...