Tuesday, September 22, 2026

पाऊसमान....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
पाऊसमान
जणू पावसाचा सत्याग्रह,
जणू पावसाचा संप आहे.
हापसून हापसून थकलेला,
कोरडाठाक हातपंप आहे.
कोरड्या विहिरी आणि धरणावर,
फक्त अल निनोचीच चर्चा आहे.
जणू हवामान तज्ञांच्या विरोधात,
रागीट पावसाचाही मोर्चा आहे.
कोरड्या ढगांच्या साखळीआड,
हल्ली पावसाचे उपोषण आहे !
बेईमान मानव जातीचे,
पुन्हा निसर्गालाच दूषण आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9406
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
22 सप्टेंबर 2026

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...