आजची वात्रटिका
----------------------------
मध्यम मार्ग
जसे डीजे मुक्तीवाले भक्त आहेत,
तसे डीजे सक्तीवाले भक्त आहेत.
डीजे वरती मध्यम मार्ग काढा,
असे सच्च्या भक्तीवाले भक्त आहेत.
डीजे मुक्ती की डीजे सक्ती ?
टोकाची चर्चा टाळली पाहिजे.
मध्यम मार्ग म्हणून का होईना,
आवाजाची मर्यादा पाळली पाहिजे.
उंदीर म्हणाला गणपतीला,
हे विचार जनाचे, मनाचे नाहीत !!
सगळेच भाविक भक्त काही,
तुझ्यासारखे मोठ्या कानाचे नाहीत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9397
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
13 सप्टेंबर 2026

No comments:
Post a Comment