आजची वात्रटिका
----------------------------
पोलखोल
समाजकारणातले राजकारण,
हळूहळू उघडे पडायला लागले.
ज्याला जिथे जिथे दडता येईल,
ते तिथे तिथे दडायला लागले.
कुठे उडवा उडवी चालू आहे,
कुठे दडवा दडवी चालू आहे.
आपलीच आपल्याकडून,
कुठे आडवा आडवी चालू आहे.
कधीच समाजकारणाच्या चौकटीत,
राजकारणाला बसवता येत नाही !
सदा सर्वकाळ सरसकट,
कधीच कुणाला फसवता येत नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9407
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
23 सप्टेंबर 2026

No comments:
Post a Comment