Showing posts with label आजची वात्रटिका. Show all posts
Showing posts with label आजची वात्रटिका. Show all posts

Sunday, September 20, 2026

अब्रूचा पंचनामा ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका.

आजची वात्रटिका
----------------------------
अब्रूचा पंचनामा
आरोपांच्या चिखलफेकीला,
भलताच बहर आला आहे.
अब्रू नुकसानीच्या दाव्याचा
हल्ली जास्तच बोलबाला आहे.
हा त्यांच्या ट्रोल होत आहे,
तो यांच्याकडून ट्रोल होत आहे.
परस्परांच्या अब्रूचा,
सोशल मीडियावर सेल होत आहे.
तुम्ही आम्ही कुणीच,
एकट्याला दोष देऊ शकत नाही !
एकमेकांच्या घेतलेल्या अब्रूची,
नुकसान भरपाई होऊ शकत नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9403
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
19सप्टेंबर 2026

 

Friday, September 18, 2026

गोंधळात गोंधळ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
गोंधळात गोंधळ
असत्याच्या भाऊगर्दीत,
कळेना सत्याचा चेहरा कोणता आहे?
अजाणते तर गोंधळलेलेच,
पण गोंधळात पडलेला जाणता आहे.
कुणी पाचर हलवून घट्ट केली,
कुणी कुणी मेखा ठोकलेल्या आहेत
संशयाच्या नजरा साऱ्या,
एकमेकांवरती रोखलेल्या आहेत.
दुसऱ्याचे ते असत्य;आपले ते सत्य,
असाच सर्वांचा दाव्यावरती दावा आहे !
सगळीकडूनच आवाज येतोय,
हाच तर आमचा गनिमी कावा आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9402
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
18सप्टेंबर 2026

 

Thursday, September 17, 2026

मौका और चौका...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
मौका और चौका
संधीचा फायदा घेण्यासाठी,
राजकीय डाव शिजू लागले.
तापवून ठेवलेल्या तव्यावरती,
आपल्या पोळ्या भाजू लागले.
ज्याला जशी साधता येईल,
तो संधी साधून घेतो आहे.
गंगा आली रे अंगणी म्हणीत,
आपले हात धुवून घेतो आहे.
त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी
जो जो संधी शोधत आहे !
दिखा मौका;लगाया चौका,
जो तो टाइमिंग साधत आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9401
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
17सप्टेंबर 2026

 

Wednesday, September 16, 2026

भाषिक अहंभाव...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
भाषिक अहंभाव
कुणाचाही भाषा दिन असो,
एक मात्र नक्की जाणवले जाते.
भाषिक अस्मिता जागवताना,
इतर भाषिकांना हिणवले जाते.
ही पुराणातली वांगी नाहीत,
हे शिळ्या कढीला आधण नाही.
भाषा हे संवादाचे साधन आहे,
भाषा हे विसंवादाचे साधन नाही.
भाषांमध्ये भगिनींचे नाते आहे,
म्हणून हा सावत्रभाव बरा नाही !
कुणाचाही भाषिक अहंभाव,
कुणासाठीच कधीच खरा नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9400
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
16 सप्टेंबर 2026

 

Tuesday, September 15, 2026

अडथळ्यांची शर्यत....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
अडथळ्यांची शर्यत
अशी कुणाचीच भावना नसते,
समाजात नवीन काही होऊ नये.
काही चांगले वाईट झाले तरी,
आपल्या स्वार्थाच्या आड येऊ नये.
समाजातील प्रत्येक बदलाचा संबंध,
आपल्या स्वार्थाशी जोडला जातो.
सहन होत नाही सांगता येत नाही,
प्रत्येकाला आपला स्वार्थ नडला जातो.
चांगल्या सामाजिक बदल साठी,
म्हणूनच वाकडी वाट धरावी लागते !
स्वार्थांच्या अडथळ्यांची शर्यत,
परिवर्तनाला पार करावी लागते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9399
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
15 सप्टेंबर 2026

 

Friday, September 11, 2026

ए.आय.चे पराक्रम ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
ए.आय.चे पराक्रम
जणू कुऱ्हाडीचा दांडा,
गोतास काळ व्हायला लागला.
मानवी अस्तित्वाच्या मुळावरती.
ए.आय. यायला लागला.
जे जे गुपित वाटत होते,
ते ते सगळे फुटायला लागले.
नाव कृत्रिम बुद्धिमत्ता असूनही,
सगळे नैसर्गिक वाटायला लागले.
तरीही सगळे आलबेल असल्याची,
माणसाची उगीचच टीमकी आहे !
फक्त सध्या तरी ए.आय. कडून,
लफडे ओपन करायची धमकी आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9395
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
11 सप्टेंबर 2026

Wednesday, September 9, 2026

लाभार्थी टोळ्या....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------------
लाभार्थी टोळ्या
आपल्या समजूती भोळ्या आहेत,
आपल्या समजूती खुळ्या आहेत.
जिकडे बघावे तिकडे,
प्रत्येकाच्या लाभार्थी टोळ्या आहेत.
सगळ्याच लाभार्थी टोळ्यांचा,
अगदी सगळीकडेच वावर आहे.
सर्वच लाभार्थी टोळ्यांकडे,
कसली ना कसली पॉवर आहे.
गरजवंतांना अक्कल नसते,
ज्याला लुटता येईल ते लुटत आहेत !
सगळ्या लाभार्थी टोळ्याच,
आज लोकांना आधार वाटत आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9393
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
9 सप्टेंबर 2026

 

Tuesday, September 8, 2026

पॉलिटिकल ऑपरेशन .....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
पॉलिटिकल ऑपरेशन
ऑपरेशनवर ऑपरेशन,
ऑपरेशनचा धडाका उडू लागला.
नव्या ऑपरेशनच्या चर्चेमुळे,
सर्वांचाच बीपी वाढू लागला.
जसे कुणाचे बीपी वाढू लागले,
तसे कुणाचे टाके ढिले होऊ लागले.
ऑपरेशनच्या अगोदरच,
कुणी कुणी कोमात जाऊ लागले.
एकीकडे ऑपरेशनची हूल आहे,
दुसरीकडे ऑपरेशनची भूल आहे !
कुणाला कळायच्या आतच,
त्यांचे ऑपरेशन सक्सेसफुल आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9392
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
8 सप्टेंबर 2026

 

Monday, September 7, 2026

डीजेचे कवित्व ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
डीजेचे कवित्व
उलट सुलट प्रतिक्रियांनी,
डीजेचा मुद्दा गाजू लागला.
नको त्या मुद्द्यांचा डीजे,
जोर जोरात वाजू लागला.
डीजेच्या ज्वलंत मुद्द्याला,
नको नको तसे वळण आहे.
अस्तिकता आणि नास्तिकता,
याचे विनाकारण दळण आहे.
डीजेच्या वाढत्या गदारोळात,
जो तो नवे मुद्दे पुरवू लागला !
मराठी भाषेच्या शुद्ध उच्चारात,
डीजे बंदीचा मुद्दा हरवू लागला !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9391
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
7 सप्टेंबर 2026

 

Sunday, September 6, 2026

महागाईचे लॉजिक...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
महागाईचे लॉजिक
वाढत्या महागाईमुळे,
रोज आभाळ फाटते आहे.
कालची वाढती महागाई,
आज स्वस्ताई वाटते आहे.
महागाईला स्वस्ताई ठरवणारे,
महागाईचे मॅजिक असते.
सत्ताधारी आणि विरोधकांचे,
कालानुरूप लॉजिक असते.
राजकीय सोयीने उडवले जाते,
असे महागाईचे पिल्लू आहे !
महागाईच्या राजकारणामध्ये,
सामान्य जनताच उल्लू आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9390
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
6 सप्टेंबर 2026

 

Saturday, September 5, 2026

परंपरेच्या नावाने ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
परंपरेच्या नावाने
विरोधाला विरोध करायचा म्हणून,
काहीच नाकारले जाऊ शकत नाही.
प्राचीन प्रथा आणि परंपरा म्हणून,
सगळेच स्वीकारले जाऊ शकत नाही.
कालसुसंगत आणि कालविसंगत,
फक्त यांचाच विचार व्हायला हवा.
कालसुसंगतेचीची भर घालताना,
कालविसंगतेला फाटा द्यायला हवा.
कालसुसंगत आणि कालविसंगत,
हा समजूतदारपणा कुणी घेत नाही!
शेवटी सुंभ जळला तरी,
त्याचा पीळ काही जाता जात नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9389
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
5 सप्टेंबर 2026

 

Friday, September 4, 2026

डीजेचा पीजे....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
डीजेचा पीजे
कुणी आपटला गेला आहे.
कुणी धोपटला गेला आहे.
सांगा तर्कसंगत विचार,
कुणाला बा पटला गेला आहे?
ज्याने कुणी गाय मारली आहे,
तो वासरू मारलेले दाखवतो आहे.
एक नकटा दुसऱ्या नकट्याला,
इथे शहाणपणा शिकवतो आहे.
कुणाला झोंबतील मिरच्या,
कुणाला वाटेल हा पीजे आहे!
गणपती बाप्पाच्या मुळावरती,
दरवर्षी पुन्हा पुन्हा डीजे आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9388
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
4 सप्टेंबर 2026

 

Thursday, September 3, 2026

खेळखंडोबा ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------------
खेळखंडोबा
कुणी खेळवितो आहे,
कुणी खेळवला जातो आहे.
सगळ्याचाच खेळ करून,
कुणी लोळवला जातो आहे.
प्रत्येकाचा खेळविता धनी,
अगदी वेगवेगळा आहे.
तो समोर नसला तरी,
त्याचा तर खेळ सगळा आहे.
खेळविणारा जिंकला जातो,
खेळणारे मात्र हरले जातात !
फक्त खेळत राहण्याचे मार्ग,
खेळणाराकडे उरले जातात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9387
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
3 सप्टेंबर 2026

 

Tuesday, September 1, 2026

माकड चेष्टा ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
माकड चेष्टा
आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा,
कुणीही कधी हैदोस माजवू नये.
उठता बसता माकडांसमोर,
कुणीही कधी नाक खाजवू नये.
माकडांसमोर नाक खाजवले की,
आपलीच माकडचेष्टा होऊन जाते.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचीही,
उरली सुरली इज्जत घेऊन जाते.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे,
माकडांसाठी तर एक ढाल आहे !
माकडांचा पारंपरिक दावा असतो,
फक्त आमचीच तर लाल आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9385
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
1 सप्टेंबर 2026

 

Sunday, August 30, 2026

सक्ती आणि भक्ती ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------------
सक्ती आणि भक्ती
प्रत्येक भाषा वाढली पाहिजे,
प्रत्येक भाषा टिकली पाहिजे.
जिथे राहायचे,जिथले खायचे,
तिथलीही भाषा शिकली पाहिजे.
कुणाच्याही भाषेचा द्वेष नको,
प्रत्येक भाषेचा आदर पाहिजे.
भाषिक समन्वयाचा नमुना,
सगळ्यांकडूनच सादर पाहिजे.
इतरांएवढीच स्वतःवरतीही,
आपल्या मातृभाषेची सक्ती पाहिजे !
इतरांकडून अपेक्षा ठेवताना,
आपली मातृभाषेवर भक्ती पाहिजे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9383
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
30ऑगस्ट 2026

 

Saturday, August 29, 2026

नेपाळ आहे साक्षीला....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
नेपाळ आहे साक्षीला
पुन्हा पुन्हा भविष्यवाल्यांना,
निसर्गाकडून ठेंगा आहे.
तरीही चर्चेमध्ये पुन्हा पुन्हा,
जगप्रसिद्ध बाबा वेंगा आहे.
जे झाले त्याची काहीच नाही,
नको त्याची भविष्यवाणी आहे.
तरीही वेडगळांना वाटत राहते,
भविष्यवाला खरा ज्ञानी आहे.
गोल गोल शब्दांमध्ये,
जगाचे भविष्य बसवले आहे !
तमाम भविष्यवाल्यांनी,
वेळोवेळी जगाला फसवले आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9382
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
29ऑगस्ट 2026

 

दुष्काळी पाहुणचार ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- दुष्काळी पाहुणचार दुष्काळ पाहणी दौरा बघून, आमचे मतही ठाम झाले. एकाचा पाहुणचार करताना, दुसरेच हकन...