Monday, May 31, 2021

झिंग

आजची वात्रटिका
---------------------

झिंग

कुणी बरळू लागले,
कुणी गरळू लागले.
वास्तव विसरून,
कुणी हुरळू लागले.

कुणी झोपेत तर,
कुणाचे झोपेचे सोंग आहे!
गरळण्याची व बरळण्याची,
प्रत्येकास झिंग आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7607
दैनिक झुंजार नेता
31मे2021
--------------

 

साफसफाई

आजची वात्रटिका
---------------------

साफसफाई

करून सवरून सगळेच,
भलतेच नाजूक झाले.
कालचे बदमाश आज,
भलतेच साजूक झाले.

नाजूकता आणि साजूकता,
आज पाळली जात आहे !
वरवर केली साफसफाई,
खरी घाण तर आत आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6162
दैनिक पुण्यनगरी
31मे 2021

 

Sunday, May 30, 2021

सरड्यांचा ओरडा


 आजची वात्रटिका

---------------------

सरड्यांचा ओरडा

हाही सरडा आहे,
तोही सरडा आहे.
रंग बदलूपणाचा,
आरडा-ओरडा आहे.


काल वेगळा रंग होता,
आज वेगळा रंग आहे !
दुसऱ्यास खोटे पाडण्याचा,
सरड्यांचा चंग आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7606
दैनिक झुंजार नेता
30मे2021

नवा फॉर्म्युला


 आजची वात्रटिका

---------------------

नवा फॉर्म्युला

हा त्याला भिडला जातो,
तो याला भिडला जातो.
जुन्याच प्रश्नासाठी,
नवा फॉर्म्युला काढला जातो.

नवे फॉर्म्युले असे की,
त्याने प्रश्न वाढत राहतात !
काल एकत्र असलेलेच,
परस्परविरोधात लढत राहतात !!


-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------------
चिमटा-6161
दैनिक पुण्यनगरी
30मे 2021

Saturday, May 29, 2021

सेवा सातत्य


 आजची वात्रटिका

---------------------

सेवा सातत्य


ज्याच्या-त्याच्या कुवतीनुसार,
जो तो नेता धावत आहे.
राजकारण्यांची कोरोणासेवा,
आम्हाला प्रचंड भावत आहे.

नेत्यांची ही लोकसेवा,
अशीच कायम राहिली पाहिजे!
सामान्य लोकांची काळजी,
अशी पाच वर्षे वाहिली पाहिजे!!


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7606
दैनिक झुंजार नेता
29मे2021

नाशिकचा ' भावे ' प्रयोग


 आजची वात्रटिका

---------------------
नाशिकचा ' भावे ' प्रयोग

कर्त्याच्या कुकर्मा विरोधात,
क्रिया पद चालवावे लागेल.
नाशिकच्या 'भावे' प्रयोगाला,
रस्त्यावर बोलवावे लागेल.

नाशिकच्या 'भावे' प्रयोगाला,
आमचा मनोभावे सलाम आहे !
न्यायासाठी योग्य संघर्ष करा,
समजू नका मी गुलाम आहे !!


-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------------
चिमटा-6158
दैनिक पुण्यनगरी
27मे 2021

प्राधान्यक्रम

आजची वात्रटिका
---------------------

प्राधान्यक्रम


कुणाची झाली चंगळ,
कुणी प्रचंड लुटले गेले.
कोरोनामुळे अनेक प्रश्न,
आपोआप सुटले गेले.

याचा अर्थ असा नाही,
आता कशाचीच उणीव नाही!
कोरोनाच्या संकटापुढे,
इतर प्रश्नांची जाणीव नाही !!


-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6160
दैनिक पुण्यनगरी
29मे 2021

 

दैनिक वात्रटिका27एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -325वा

दैनिक वात्रटिका 27एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -325वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1NoornI--tmMB-ZAcXYuN3...