Wednesday, March 31, 2021

लोकल टू व्होकल

आजची वात्रटिका --------------------- लोकल टू व्होकल

कोरोनाचा आता,
घातक हल्ला आहे.
लॉक डाऊनच्या विळख्यात,
एक-एक जिल्हा आहे.

जिल्ह्यामागे जिल्हा,
हळूहळू लॉक आहे !
लोकल टू व्होकल,
कोरोनाचा शॉक आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7560
दैनिक झुंजार नेता
31मार्च2021

 

इशारा

आजची वात्रटिका
---------------------

इशारा

अजूनही कोरोना नाहीच,
म्हणणारांची धन्य आहे.
ज्यांनी लॉकडावून ढिले केले,
त्यांच्या पदरी पुण्य आहे.

जे जे समजदार आहेत,
त्यांना इशारा काफी आहे !
तुम्ही पुण्य नक्की कमवा,
पण कोरोना महापापी आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6103
दैनिक पुण्यनगरी
31मार्च2021

 

Monday, March 29, 2021

भेटी-गाठी

आजची वात्रटिका
---------------------

भेटी-गाठी

कुणाची बोलाचाली,
कुणाच्या मिठ्या आहेत.
कुणी कुणाला भेटताच,
कपाळावर आठ्या आहेत.

राजकीय भेटी-गाठीला,
वेगवेगळे अर्थ असतात !
भित्यापोटी ब्रम्हराक्षस,
जरी कुणी धूर्त असतात!!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6102
दैनिक पुण्यनगरी
29मार्च2021

 

Sunday, March 28, 2021

कोरोनाचे पुनरागमन

 

आजची वात्रटिका
---------------------

कोरोनाचे पुनरागमन

आता तर कोरोना,
लॉक डावूनलाही धजत नाही.
रुग्णांचे वाढते आकडे बघा,
आम्ही ते मनाने मोजत नाही.

कोरोना सांगतोय,सावधान
मी पुन्हा फिरून आलो आहे !
आता फक्त मोजत बसा,
जे मी पेरूण झालो आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6101
दैनिक पुण्यनगरी
28मार्च2021

Saturday, March 27, 2021

लॉकडावूनचा फेरा

आजची वात्रटिका
------------------------

लॉकडावूनचा फेरा

जमावबंदी,संचारबंदी,
कुठे लॉक डाऊनचा फेरा आहे.
कुणाच नकारात्मक,
कुणाचा सकारात्मक शेरा आहे.

विरोध आणि समर्थन,
यात लॉकडावून जारी आहे !
तो मात्र गोंधळलेला,
ज्याला जिंदगी प्यारी आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------
फेरफटका-7559
दैनिक झुंजार नेता
27मार्च2021

 

दुहेरी बाधा

आजची वात्रटिका
------------------------

दुहेरी बाधा

जशी राजकारणाला कोरोनाची,
तशी कोरोनालाही
राजकारणाची बाधा आहे.
संसर्गाचा वेगही,
पहिल्यापेक्षा जादा आहे.

ज्याला जसे साधता येईल,
तसे राजकारण साधीत आहेत!
राजकारण आणि कोरोना,
दोघेही परस्परांनी बाधित आहेत !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6100
दैनिक पुण्यनगरी
27मार्च2021

 

Friday, March 26, 2021

पापी पेट का सवाल

आजची वात्रटिका
------------------------
पापी पेट का सवाल
उसळत्या कोरोनाची,
सगळी वेगळीच तऱ्हा आहे.
कुणी म्हणतो कोरोना खोटा,
कुणी म्हणतो खरा आहे .
कोरोनाच्या साथीचा,
विचित्र हाल-हवाल आहे !
सांगा कसं जगावं?
पापी पोटाचा सवाल आहे!!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------
चिमटा-6099
दैनिक पुण्यनगरी
26मार्च2021

 

नाट्यमय घडामोडी

आजची वात्रटिका
------------------------
नाट्यमय घडामोडी
कुठे मानापमान चालू,
कुठे संशयकल्लोळ माजला आहे.
नाट्यमय घडामोडींनी,
अख्खा महाराष्ट्र गाजला आहे.
तो मी नव्हेच,
हे आज सही रे सही आहे !
गाढवाच्या लग्नाची,
सगळीकडूनच घाई आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------------
फेरफटका-7558
दैनिक झुंजार नेता
25मार्च2021

 

बिहार पॅटर्न .... मराठी वात्रटिका

  आजची वात्रटिका --------------------- बिहार पॅटर्न जसे कर्म तसे फळ, हे लगेच प्रत्यक्षात आले. महाराष्ट्रात जे कमावले, ते बिहारमध्ये गमावले ग...