Tuesday, March 2, 2021

दाम करी काम

आजची वात्रटिका
----------------------

दाम करी काम

कायद्यामधील फटी शोधून,
नेमक्या मेखा मारल्या जातात.
कायद्यानेच कायद्याला,
जाहीर खडे चारल्या जातात.

कायद्याशी दोन हात करणे,
गोर-गरिबांचे काम नाही !
त्याच्या तळतळाटात राम नाही,
ज्याच्याकडे हरामचा दाम नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-60745
दैनिक पुण्यनगरी
2मार्च2021

 

No comments:

स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...