आजची वात्रटिका
------------------
विषवल्ली
सारेच आलबेल आहे,
ही निव्वळ फुशारी आहे.
निर्मळता कुठे उरली?
सर्वकाही विषारी आहे.
वेगवेगळ्या विषाचे
रोजच फुत्कार आहेत.
ऐकू येऊनही बेदखल,
सारेच चित्कार आहेत.
विषाने बाधलेली,
दिल्ली आणि गल्ली आहे !
मनोमनी फोपावलेली,
सारीच विषवल्ली आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6091
दैनिक पुण्यनगरी
18मार्च2021

No comments:
Post a Comment