Wednesday, November 30, 2022

मतदार जागृती... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

मतदार जागृती

खाणाऱ्यांना खाऊ घालतात,
पिणाऱ्यांना पाजली जाते.
चारूकाम आणि दारूकाम,
यांनी निवडणूक गाजली जाते.

बोटीला आणि बाटलीला,
मतदारही जागले जातात !
ज्यांची कुठली शक्यता नसते,
ते सीटसुद्धा लागले जातात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8110
दैनिक झुंजार नेता
30नोव्हेंबर2022

 

'तळी' राम उचले... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

'तळी' राम उचले

कुणाचीही तळी उचलणारे,
लोक रोज भेटतात मला.
येळकोट येळकोट करीत,
लोक रोज गाठतात मला.

ते नेमके तिकडेच जातात,
जिकडे कुठे गुळ खोबरे आहे.
त्यांची असते एकच शोधाशोध,
आपल्यापेक्षा कोण चाभरे आहे?

उधळलेला भंडारा विचारतो तो,
नेमके कुणाचे सांग भले आहे?
उचला-उचली करणाऱ्या,
तळीरामांचेच आज चांगभले आहे !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6648
दैनिक पुण्यनगरी
30नोव्हेंबर2022

 

Tuesday, November 29, 2022

ज्याची त्याची मर्यादा... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

ज्याची त्याची मर्यादा

एकाने कायदा हातात घेतला म्हणून,
दुसरेही कायदा हातात घेऊ लागले.
न्यायालयातून न्यायाची अपेक्षा नाही,
म्हणून ते स्वतःच न्याय देऊ लागले.

आरोपीपेक्षा न्यायालयाने,
ही गोष्ट गंभीरतेने घेतली पाहिजे!
न्याय तात्काळ दिला नाहीतरी,
त्याला कालमर्यादा घातली पाहिजे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6647
दैनिक पुण्यनगरी
29नोव्हेंबर2022

 

वेडगळपणा .... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

वेडगळपणा

कधी कधी वेडगळपणाही,
प्रायोजित केला जातो.
वेडगळपणाचा कार्यक्रम,
आयोजित केला जातो.

नियोजनपूर्वक आयोजन,
हे वेडगळपणाचे प्रयोजन असते!
हसवणूक आणि फसवणूक
हे वेगळपणाचे नियोजन असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8109
दैनिक झुंजार नेता
29नोव्हेंबर2022

 

Monday, November 28, 2022

दगड आणि विटा .... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

दगड आणि विटा

जो हारतो आणि जिंकतो,
ते एकमेकांचे भाऊ असतात.
आपल्या निवडणुकीचे प्रकार,
दगडापेक्षा विटा मऊ असतात.

कुठे विटांना,कुठे दगडांना,
म्हणूनच गुलाल लागले जातात!
आपापल्या आवडीनिवडीचे,
परिणाम निश्चित भोगले जातात!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8108
दैनिक झुंजार नेता
28नोव्हेंबर2022

 

बदनामीचे बुमरँग... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

बदनामीचे बुमरँग

आपली बदनामी होणारच नाही,
याची तरी कुठे हमी असते?
म्हणूनच दुसऱ्याच्या बदनामीमध्ये,
आपलीसुद्धा बदनामी असते.

बदनामीसाठी टपलेली,
जिकडे तिकडे राखीव गॅंग आहे !
तरीही बदनामीचे तंत्र असे की,
जेवढे घातक;तेवढे बुमरँग आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6646
दैनिक पुण्यनगरी
28नोव्हेंबर2022

 

Sunday, November 27, 2022

तुमचा आमचा अनुभव.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

तुमचा आमचा अनुभव

माझ्या पाठीमागे कुणी म्हणाले,
मी कडवट नाही,मी बरे बोलतो.
तोंडावरती कोण मान्य करील?
फक्त बरे नाही,मी खरे बोलतो.

त्यावर करतो प्रहार मी,
जे जे नाटके आणि लटके आहे.
ज्याला वाटते त्याला वाटो,
माझे तुमचे तोंडच फाटके आहे.

जे हे सोसतो असले सारे,
मीच फक्त काही एकटा नाही !
सत्याचे नातेगोते असे की,
कुणी थोरला अन धाकटा आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6645
दैनिक पुण्यनगरी
26नोव्हेंबर2022

 

पुराव्या अभावी....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- पुराव्या अभावी.... मोठे मासे नामानिराळे, छोटे मात्र पकडले जातात. कायद्याचे लांब लांब हात, इथे मात्...