Saturday, May 11, 2024

पुराव्या अभावी....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

पुराव्या अभावी....

मोठे मासे नामानिराळे,
छोटे मात्र पकडले जातात.
कायद्याचे लांब लांब हात,
इथे मात्र आखडले जातात.

मास्टर माईंड मोकाट,
हस्तकांना मात्र शिक्षा असते.
सबळ पुराव्याची,
वांझोटी अशी भिक्षा असते.

दुधाची तहान अशी,
ताकावरती भागवली जाते !
सत्याग्रहींची न्याय्य अपेक्षा,
पुराव्या अभावी नागवली जाते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8559
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
11मे2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...