Monday, May 6, 2024

मतांची शेती...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

मतांची शेती

वरवर वाटत राहते,
ते निवडणूक लढत आहेत.
मात्र पैशांची पेरणी करून,
मतांचे पीक काढत आहेत.

मतांच्या भरघोस पिकासाठी,
नको त्याला खतपाणी आहे.
त्यामुळेच वाटत राहते,
निवडणूक आणीबाणी आहे.

मतांच्या पिकावरती,
फवारणी आणि धुरळणीआहे !
द्वेषाचे खतपाणी घालून,
लोकांची भुरळणी आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8554
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
6मे2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 14मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 285 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका l 14मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 285 वा l पाने -54 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1HWqvXw5I3T5tgNYcFUDpa...