Wednesday, May 29, 2024

अभ्यासक्रमाचे श्लोक ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

अभ्यासक्रमाचे श्लोक

जे जे चांगले ते ते पुढे घेऊन जावे l
जे जे कालबाह्य ते ते टाकून द्यावे ll
परंपरा जपताना राखावे भान l
अभिमान हवा;नको दुराभिमान ll १ll

पुन्हा नव्याने तिची स्मृती का आली?
जाळून जिची पार राख रांगोळी केली ll
काळाची पावले उलटी फिरवू नका रे l
नव्याने पुन्हा मनुस मिरवू नका रे ll २ ll

विद्यार्थी बनावा ज्ञानयोगी समर्थ l
अंधभक्त होईल ते ज्ञान असे व्यर्थ ll
जगावे विज्ञान, वागावे विज्ञान l
नव्या युगाचे-जगाचे ठेवा भान ll ३ ll

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8576
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
29मे2024
 

No comments:

daily vatratika...18octo2024